प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या निवडणूक प्रचार दौरा संबंधाने पोलीस स्टेशन कन्हान येथे रूट मार्च…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

  पारशिवनी:- तालुक्यातील कन्हान पोलिस स्टेशन तर्फे आज सांयकाळी दिड तास रुप मार्च घेण्यात आला.

        उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अनिल मस्के(भापोसे) सावनेर विभाग सावनेर यांचा प्रमुख उपस्थितीत रुप मार्च घेण्यात आला.

           प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचा कन्हान शहरात निवडणूक दौरा होणार आहे.या संबंधाने पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील गाधीचौक ते आबेडकर चौक,तारसा रोड चौक,सात नंबर नाका,गऊहिवरा चौक,गणेश नगर,राम नगर,हनुमान नगर ते परत गाधी चौक पोलिस स्टेशन पर्यत रूट मार्च घेण्यात आला.

          सदर रूट मार्च मध्ये ०४ अधिकारी,२१ RPF अंमलदार,व २ RCP पथक,कन्हान पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मी,होमगार्डसह अनेक पोलीस रूटमार्च मध्ये उपस्थित होते.