एक गाव, एक वाचनालय” उपक्रमांतर्गत हालेवारा येथे पार पडला नवीन वाचनालय इमारतीचा लोकार्पण सोहळा…. — हालेवारा येथील बस स्थानकाचे नुतनिकरण व पाणपोईचे उद्घाटन… — हालेवारा व परिसरातील लोकांचा वाचनालय उभारणीत स्वयंस्फुर्तीने सहभाग. जनजागरण मेळाव्यातुन दिला शासकिय योजनांचा लाभ.

डॉ. जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमके हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांच्या शिक्षणासह बौद्धीक कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यावे व नक्षल विचारधारेकडे आकर्षीत होवू नये. तसेच त्यांना जगात घडत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/प्रादेशिक / स्थानिक घडामोडी, शासकिय योजना इ. बाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पोमकें हालेवारा परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातून हालेवारा येथे नवीन इमारतीमध्ये सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली. सदर वाचनालयाचे आज दिनांक ०५/०४/२०२३ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते उद्घाटनाद्वारे लोकार्पण सोहळा पार पडला.

         या लोकार्पण सोहळ्यास पोमकें हालेवारा हद्दीतील वद्वेगट्टा, गट्टेपल्ली, नागुलवाडी, पिपली, बुर्गी, जिजावंडी, कुंडम, देवदा, मवेली व बट्टेर इ. गावातील ५०० ते ६०० च्या संख्येने नागरीक उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच पोमकें पासुन ते वाचनालयापर्यंत पारंपारीक रेला नृत्यासह ग्रंथदिडीला सुरुवात करण्यात आली. तसेच गावातील प्रमुख मार्गावरुन शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरीकांसह ही ग्रंथदिंडी वाचनालयापर्यंत काढण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. वाचनालयामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याकरीता विद्यार्थ्याच्या बैठक व्यवस्थेकरीता टेबल, चेअर व बुक ठेवण्याचे कपाट व इतर पायाभुत सुविधेसह २५० हुन अधिक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासोबतच हालेवारा गावातील बस स्थानकाचे नुतनिकरण पोलीस अंमलदार व ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आले. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्याने गावातील लोक व आजुबाजुचे परिसरातील नागरीक हालेवारा येथील बाजाराकरीता येतात, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय लक्षात घेऊन बस स्थानकाजवळ नवीन पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

        सदर कार्यक्रमात मान्यवरांनी आपले संबोधनातून विद्यार्थी व नागरिकांना शिक्षण व वाचनाविषयीचे महत्व पटवून दिले. श्री. नीलोत्पल सा. यांनी “एक गाव एक वाचनालय” ही संकल्पना मांडत आपल्या भाषणामध्ये सांगीतले की, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एकुण ६० ठिकाणी वाचनालय उभारण्याचे उद्दीष्ट असल्याने आज २३ व्या वाचनालयाचे पोमकें हालेवारा येथे उद्घाटन पार पडले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी व भविष्यात स्पर्धा परिक्षेची तयार करुन या वाचनालयातून चांगले अधिकारी घडावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच हालेवारा येथील संपूर्ण नागरिकांचे हार्दीक अभिनंदन करुन भविष्यात पोलीस प्रशासन आपल्या प्रत्येक कार्यात नेहमीच मदतीसाठी तत्पर असेन असे आश्वासन दिले. यानंतर झालेल्या मेळाव्यात उपस्थित नागरीकांना ई-श्रम कार्ड- २७०, आयुष्यमान भारत कार्ड १८५, पॅन कार्ड प्रधानमंत्री किसान मानधन कार्ड १९२ वाटप करण्यात आले. यासोबतच कागदपत्रे ठेवायची फाईल – – पिपली व बुर्गी या दोन गावांना ५०० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या २ नग वाटप करण्यात आले. – ७० व ५००, –

       सदर लोकार्पण सोहळ्यास गडचिरोली जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा सिआरपीएफचे कमाण्डेंट श्री. शैलेंद्रकुमार, ” उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. सुदर्शन राठोड, तसेच परिसरातील सरपंच, सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

        सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली श्री. सुदर्शन राठोड, पोमकें हालेवाराचे प्रभारी अधिकारी श्री. धनाजी देवकर, पोउपनि वासुदेव पवार, पोउपनि, अजय किरकन, मपोउपनि प्रिया पाटील, पोमकें हालेवारा येथील सर्व अंमलदार व तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. धनंजय पाटील व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.