Home उपक्रम समृद्ध पंचायत राज अभियानातून अर्थसामर्थ्याला बळ :-  कृषिमंत्री भरणे… — महिला...

समृद्ध पंचायत राज अभियानातून अर्थसामर्थ्याला बळ :-  कृषिमंत्री भरणे… — महिला स्वयं सहाय्यता समूहांना ७.८५ कोटींचे बिनतारण बँक कर्ज वितरण…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरशिंहपुर प्रतिनिधी 

        पूर्वी बँक कर्ज मिळवण्यासाठी तारण, शिफारस आणि अनेक हेलपाटे मारावे लागत होते; मात्र आज महिला स्वयं सहाय्यता समूहांनी आपल्या शिस्तबद्ध कार्यातून बँकांचा विश्वास संपादन केला असून कोणतीही तारण न ठेवता मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळत आहे. त्यामुळे भगिनींनो, कर्ज घेणे ही संधी समजून जास्तीत जास्त लाभ घ्या, असे स्पष्ट आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.

        मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत इंदापूर तालुक्यात महिला स्वयं सहाय्यता समूहांसाठी आयोजित महाकर्जवाटप मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात १६७ महिला स्वयंसहाय्यता समूहांना एकूण ७कोटी ८५ लाख रुपयांचे बिनतारण बँक कर्ज कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

           यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी सचिन खुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, बँक ऑफ महाराष्ट्रच्या महिला प्रतिनिधी ६६ महिलांची दखल आता केवळ राज्य किंवा देशापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण जगाने ती घेतली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२६ हे वर्ष १आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे, हे महिलांच्या कर्तृत्वाचे मोठे मान्यत्व आहे.

          तालुक्यात महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य उल्लेखनीय असून कोणताही समूह एनपीए मध्ये जाऊ न देण्यात महिलांची आर्थिक शिस्त व सीआरर्षीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरत आहे.

        मीना, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर यांच्यासह विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

         कृषिमंत्री भरणे पुढे म्हणाले की, तुमच्यासोबत तुमचा मामा तर आहेच, पण हा मामा कायम तुमच्या पाठीशी उभा राहील, असा शब्द देत बँकिंग किंवा अन्य कोणत्याही अडचणीसाठी आपण नेहमी मदतीसाठी उपलब्ध राहू, असे आश्वासन कृषिमंत्री भरणे यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित महिलांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला.

         कार्यक्रमाची प्रस्तावना करताना गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी सांगितले की, गतवर्षी इंदापूर तालुक्यासाठी ३३ कोटी – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ३१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्ट पुढील महिन्यापर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            यावेळी व्यासपीठावर बैंक अधिकारी महेश शेळके, वैभव लाहोत, अमोल वाघमारे, शरद सूळ, रोहिदास राठोड, अशोक थोरात, जयदीप तोरणे, अशोक भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणी ननवरे, आदित्य मांदळे, अमोल गलांडे, सुनिता दातखिळे, ज्ञानेश्वर राऊत, अमर कदम, निर्मला निमगिरे, चेतन रांजणकर, तेजस्विनी शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समाधान भोरकडे यांनी केले.