या तीन भावाच्या एका मित्राने या तिघांनाही आपल्या घरी एके दिवशी जेवायला बोलविण्याचे ठरविले, आपली इच्छा आपल्या पत्नीकडे बोलून दाखविली, तेव्हा त्याची पत्नी त्यास म्हणाली की, ते तिघेजण आणि आपल्या घरातील आपण चार जण ( दोन मुले आणि पती पत्नी ), एवढ्या ना पुरेल एवढेच राशन घरामध्ये आहे, यापेक्षा जास्त राशन घरात नाही. तेव्हा तिचा पती तिला म्हणाला काही हरकत नाही तू स्वयंपाक कर मी माझ्या मित्रांना बोलावितो.
त्याने त्या तीन भावांना म्हणजे आपल्या तीन मित्रांना घरी जेवायला बोलावले. आणि म्हणाला,” बसा जेवायला “. यावर तेथे घे म्हणाले असे कसे तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला बसले पाहिजे, आपण सर्वजण बसून एकदाच जेवण घेऊ या,” असा आग्रह त्यांनी धरल्यामुळे तीन मित्र दोन पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले अशी एकूण सात ताटे मांडण्यात आली, सात जणही एकदाच जेवायला बसले,
जेवायला सुरुवात केली, जेवण्यात जिलेबी चा एक पदार्थ होता, तीन भावांपैकी मध्ये बसलेल्या भावाने आपल्या ताटेतील जिलेबी संपल्यामुळे त्याने आपल्या डाव्या बाजूला बसलेल्या भावाकडे जिलेबी ची मागणी केली, तो म्हणाला मला पुरेल एवढे आहे, तुला देणार नाही, मग त्याने उजवीकडे बसलेल्या भावाकडे जिलेबी ची मागणी केली, तेव्हा त्याने आपल्यातील अर्धी जिलेबी त्यास दिली. पुन्हा त्याने आपल्या डाव्या बाजूच्या भावाकडे एक चपातीची मागणी केली, त्याने ती नाकारली, हे पाहून उजव्या बाजूकडे बसलेल्या भावाने आपल्या ताटातील एक चपाती त्याला दिली.
या तिघांच्याही मित्राने जेवायला बसण्यापूर्वी आधी सांगितले होते की माझे बहुजन हे मर्यादित थालीचे आहे, कारण घरात जेवढे राशन होते तेवढे राशन मधून हे बनविण्यात आलेले आहे. हे ह्या तिघाही भावांना माहीत होते,
परंतु यातील पहिल्या भावाला आपले पूर्ण पोट भरल्याशिवाय समाधान मिळत नसे, तर मध्ये बसलेल्या भावाला गच्च पोट भरल्याशिवाय समाधान मिळत नसे, आणि तिसऱ्या भावाला मात्र अर्धवट पोट जरी असले तरी त्यास जेवण घेतल्याचा आनंद मिळत असे, म्हणजेच एखादा पदार्थ जर ताटत नसेल किंवा एखादी चपाती किंवा थोडासा भात जरी ताट येत असला तरी जेवढे मिळेल तेवढे खाऊन तो समाधान मानत असे, त्यातून पण तो आनंद घेत असे. भुके राहण्यापेक्षा जे काही मिळते ते खाऊन समाधान असले पाहिजे, या विचाराचा तो होता.
बहुजन संपले, सर्वांनी हात धुतले, बैठकीत जाऊन बसले, मित्र म्हणाला,” कसे होते जेवण ? पोट भरले की नाही ? कारण मर्यादित थालीचे हे जेवण होते, त्याबद्दल क्षमा इच्छितो. कारण घरात जेवढे राशन होते तेवढ्याचे बनविले.” यावर त्या तिघांपैकी समाधान आणि आनंद मानणारा जो भाऊ आहे, त्याने म्हटले ” मित्रा, मर्यादा ही झालेला असले तरी प्रेमाला नसते, तू आम्हाला भरभरून प्रेम दिलेस, आमचे पोट भरले, नुसते पोटच नाही तर मन आणि बुद्धी पण तृप्त झाली “. अशा त्याच्या बोलण्यामुळे मित्र आणि त्याच्या पत्नीचे डोळे पानावले.
बोध: 1 यातील तीन भाऊ म्हणजे, स्वार्थ मोह त्याग.
2 प्रवृत्ती विकृती आणि संस्कृती
या गोष्टीतील तीन भावांपैकी स्वार्थी भाऊ कोणता लोभी कोणता आणि त्याही कोणता ,? आणि प्रवृत्ती विकृती आणि संस्कृती म्हणजे काय ? याचे उत्तर 9420912209 या माझ्या वॉट्सअप नंबरवर द्या.



