बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपूर प्रतिनिधी
भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने एलिमकोच्या सहकार्याने इंदापूर तालुक्यातील दिव्यांग व वयोश्री योजनेतील ४, २७९ लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या सुमारे २० हजार सहाय्यक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे तालुक्यातील गरीब, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रतिष्ठानने काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत एडीप व आरव्हीवाय (वयोश्री) योजनेंतर्गत तालुक्यातील लाभाथ्यर्थ्यांची तपासणी केली होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमास क्षेत्रीय विपणन केंद्राचे उपप्रबंधक केशव गीते, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुकाअध्यक्ष हनुमंत कोकाटे, नगराध्यक्ष भरत शाहा, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले नवनाथ रुपनवर, संचालक श्रीकांत बोडके, उपसरपंच संतोष सुतार, नाथाआबा रुपनवर,६६ आयुष्यातील गोरगरीब जनता, दिव्यांग आणि वयोश्रींचा सेवक म्हणून काम करणे हेच माझे ध्येय असून यांची सेवा केली तर देव भेटतो.
निवडणुका येतील-जातील, मात्र समाजकारणात कधीही राजकारण न करता गोरगरिबांचे काम केले तरी तो आयुष्यभर विसरत नाही. या योजनेतील राहिलेल्या लाभार्थ्यांना आगामी काळात साहित्याचे वाटप केले जाईल.
दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री…
पृथ्वीराज जाचक, इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, श्रीमंत ढोले, संचालक श्रीकांत बोडके,उप सरपंच संतोष सुतार, हनुमंत बंडगर, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, छत्रपतीचे संचालक तानाजी शिंदे, राहुल जाधव, सचिन सपकळ, कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी सरपंच राहुल साबळे, दीपक भरणे, गुलाब म्हस्के, संजय चव्हाण तसेच भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अनिकेत भरणे, श्रीराज भरणे, अभिजित भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांपर्यंत थेट मदत पोहोचवण्याचा आदर्श इंदापूर तालुक्यात निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



