भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुणे जिल्ह्यात युवा मोर्चा करणार जोरदार स्वागत- अंकिता पाटील ठाकरे

 

निरा नरसिंहपुर दिनांक 5

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार 

         भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात नियोजित दौरा होणार असून या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांचे पुणे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वागत करणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी नियोजित दौरा संदर्भाने पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठकीस संवाद साधताना सांगितले.

        चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजित दौरा संदर्भाने भोर विधानसभा मतदारसंघातील सुपर 100 पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या बैठकीस भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत संवाद साधत दौऱ्याचे नियोजन केले.

        यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, सरचिटणीस शेखर वढणे, राहुल शेवाळे, वैशाली सणस, निवडणूक प्रमुख भोर विधानसभा किरणदादा दगडे पाटील, भा.ज.यु.मो. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे दक्षिण प्रभारी कुणाल टिळक, सर्व मंडल अध्यक्ष,कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.