सोनसरी ग्रामपंचायत शिपाई यांना तिन अपत्य असल्याने पदमुक्त करा.:- राजेंद्र रामटेके  — ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी केली शासनाची फसवणूक…

 

  जिल्हा प्रतिनिधी

     गडचिरोली 

          गडचिरोली जिल्ह्यातंर्गत कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय सोनसरी येथे शिपाई नंदाबाई दौलत हारामी कार्यरत आहेत.

          मात्र त्यांना तीन अपत्य असल्यामुळे शासन निर्णय लोकसंख्या धोरण 2000/प्र.क.57/00/कु.क. 1 दि.9 मे 2000,जिआर नुसार त्यांना पदावरून कमी करा अशी तक्रार राजेंद्र रामटेके यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे केली आहे. 

            प्राप्त माहितीनुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळाली असून श्रीमती नंदाबाई दौलत हारामी रा. सोनसरी हे ग्रामपंचायत कार्यालय सोनसरी येथे शिपाई या पदावर कार्यरत आहेत.

         त्यांचे पहिले अपत्य कुमार प्रवीण दौलत हारामी यांचा जन्म दिनांक 27/7/2001 चा आहे तर दुसरू अपत्य कुमार प्रितम दौलत हारामी याचा जन्म दिनांक 18/10/2003 चा आहे आणि तिसरे अपत्य कुमार समीर दौलत हारामी याचा जन्म दिनांक 14/1/2006 चा आहे.असे त्यांना अपत्य आहेत. 

       ज्ञशासकीयज्ञ नियमानुसार तीन अपत्य असलेल्या व्यक्तीला शासकीय कर्मचारी होता येत नाही.याचबरोबर सोनसरी ग्रामपंचायत शिपाई पदासाठी कोणतेही जाहिरात काढलेली नव्हती.

        यामुळे सौ.नंदाबाई दौलत हारामी यांची नियुक्ती नियमाला धरून नसल्याने,एक प्रकारे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी शासनाची फसवणूक केलेली दिसते आहे.

           विशेष म्हणजे ग्रामपंचायतचा शिपाई यांची बढती चपराशी म्हणून प.स.येथे होत असते.

          त्यामुळे शिपाई नियुक्ती प्रकरणाची तात्काळ चौकशी करून नंदाबाई हारामी यांना शिपाई पदावरून रिक्त करावे व त्यांना दिलेला पगार वसूल करण्यात यावे अशी मागणी राजेंद्र रामटेके यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे लेखी तक्रारी द्वारा केली आहे.