नवजीवन सीबीएसई मध्ये शिक्षक दिन साजरा…

 

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

 

दि. ५/०९/२३

साकोली:नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकिय अधिकारी विनोद किरपान व सतिश गोटेफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जंयती निमित्ताने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

         यावेळी अध्यक्षस्थानी नवजीवन सीबीएसईचे स्वयंप्रशासन प्राचार्य प्रारब्ध बोंद्रेकर, उपप्राचार्य भावार्थी नवखरे, पर्यवेक्षिका आर्या उदापुरे, वरीष्ठ शिक्षक स्वस्तिक व्यास व प्रशासकीय अधिकारी वंशिका मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विप प्रज्ज्वलन करून केली.

             स्वंयप्रशासन विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्याना प्राचार्य प्रारब्ध बोंद्रेकर व उपप्राचार्य भावार्थी नवखरे यांनी शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले. प्राचार्य मुजम्मिल सय्यद सर यांनी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे शिक्षणप्रसारक महात्मा ज्योतिबा फुले व भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका व स्त्री शिक्षणाचे प्रसार करणाऱ्या सावित्री बाई फुले यांना खरे शिक्षक दिनाचे हक्कदार संबोधून आजचा कार्यभार स्वयंप्रशासन प्राचार्य प्रारब्ध बोंद्रेकर यांना सोपवून संपूर्ण दिवसभर स्वयंप्रशासन राबविण्यात आला.

            शेवटी शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वंयप्रशासन पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांविषयी असणारे अभिमान, शिक्षकांचे कार्य गीत व भाषनांच्या माध्यमातून व्यक्त केले. शिक्षकांच्या कला कौशल्यांची सम्यक अशा नकला करून कार्यक्रमात विविध रंग भरली.

             स्वंयप्रशासन यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल प्राचार्य मुजम्मिल सय्यद तसेच सर्व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतूक केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु. प्रथा तनवानी व कु. करिष्मा पातोडे तर आभार निधी कापगते या विद्यार्थीनींने केले. या कार्यक्रमाला सर्व स्वंयप्रशासन शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.