दर्यापूर पं स कार्यालयातुन रमाई आवास योजनेच्या फाईल्स गहाळ.. — नागरिकांची तक्रार… — आवास योजनेपासून वंचित ठेवण्याचे छडयंत्र कुणाचे? — गंभीर प्रकरण…

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक 

   दर्यापूर पं.स.कार्यालयातून रमाई आवास योजनेच्या चार लाभार्थ्यांच्या फाईल्स गहाळ झाल्या असून याबाबतची तक्रार चार लाभार्थ्यांनी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अमरावती यांच्याकडे केली आहे.

       संजय शरद शेळके,युवराज तुकाराम जामनिक,दिपक अरुण घनबहाद्दूर रा.भामोद व गुणवंत भिकन शेजे रा.म्हैसपूर असे फाईल्स गहाळ झालेल्यांची नावे असून या सर्वांनी दि 8 मार्च 23 व 24 मार्च 23 रोजी रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मिळावे म्हणून आवश्यक सर्व कागदपत्राची पूर्तता करुन फाईल्स दर्यापूर प.स.कार्यालयात सादर केल्या होत्या.

         जवळपास पाच महिन्याचा कालावधी होत असतानाही अद्यापही रमाई आवास योजनातंर्गत घरकुल मंजूरी बाबत दखल घेण्यात आली नाही,उलट रमाई आवास योजनेअंतर्गत फाईल गहाळ करण्यात आल्या असल्याचे समोर आले.

               यामुळे चारही लाभार्थी हे दि 17 ऑगस्टला दर्यापूर पं स मधिल धवड यांना भेटले,धवड यांनी ग्रामिण गृह निर्माण अभियंता यांना बोलावून चारही लाभार्थ्यांच्या फाईल्सबाबत विचारणा केली असता ग्रामिण गृह निर्माण अभियंता वासनिक यांनी त्यांच्या पूर्वीच्या कर्मचारीकडून चार्ज लिस्टची पडताळणी करुन सांगितले की गाठे यांनी मला चारही लाभार्थ्यांच्या फाईल्स चार्जमध्ये दिल्या नाहीत.

          सदर चारही लाभार्थी हे मोलमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात.त्यामुळे त्यांनी दर्यापूर पं.स.मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुल साठी फाईल्स सापडल्या नाहीत तर त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत.

       त्याच प्रमाणे भामोद ग्रा.प. मध्ये घरकुलाचा भोंगळ कारभार असल्याचे समोर आले असून रामदास भगूजी रायबोले यांना 95-96 मध्ये इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकुल मिळाले होते. त्याच इसमास 19-20 मध्ये पुन्हा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुन्हा घरकुल मिळाले आहे. 

            तसेच विनायक गोपाळ अभ्यंकर,नलू विनायक अभ्यंकर यांना दोन घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे.

            चारही लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचा आदेश गटविकास अधिकारी,प.स. दर्यापूर यांना देण्यात यावा व झालेला अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांच्याकडे केली असून,असे न झाल्यास चारही जणांना कुटुंबासह उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशाराही देण्यात आला..