शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव व क्षेत्राधिकारी मेसर्स. लॉयड्स मेटल व एनर्जी लिमिटेड सुरजागड लोह खनिज खाण तह. ऐटापल्ली, जि. गडचिरोली या प्रकल्पाकडून आर्थिक लाभ घेऊन नागरिक व महाराष्ट्र सरकारची दिशाभूल करून प्रकल्प मालकाच्या गाडीमध्ये बसून प्रदूषणाबाबत पाहणी केल्या जात असल्याची गंभीर तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी चंद्रपूर व जिल्हाधिकारी गडचिरोली यांना राजेश वारलूजी बेले यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव व क्षेत्राधिकारी नंदकुमार लोमटे यांनी मेसर्स लॉयड्स मेटल व एनर्जी लिमिटेड सुरजागड लोह खनिज खाण तह. ऐटापल्ली, जि. गडचिरोली या प्रकल्पाची प्रदुषणाबाबत पाहणी करण्याकरीता प्रकल्प मालकाच्या वाहनात बसून प्रदुषणाबाबत पाहणी करण्याअगोदर प्रकल्प मालकाला फोन करून सांगण्यात येते की, आम्ही येणार आहे त्या मोबदल्यात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ यांना देण्यात येते.
अशा प्रकारच्या अधिका-यांवर उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.चंद्रपूर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर या कार्यालयात संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था, चंद्रपूर यांनी मेसर्स लॉयट्स मेटल व एनर्जी लिमिटेड सुरजागड लोहखनिज खाण तह. ऐटापल्ली, जि. गडचिरोली या प्रकल्पाच्या घातक वायू प्रदुषण, ध्वनी प्रदूषण व जल प्रदूषण होत असल्याची तक्रार दि.०६/०६/२०२४, १२/११/२०२४, १६/१२/२०२४ व ०४/०४/२०२५ रोजी म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी कार्यालय यांना दिली असतेवेळी प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्या आदेशानुसार मोका पंचनामा दि.२८/०८/२०२४ व ०७/०१/२०२५ रोजी केलेला मोका पंचनामा हा प्रकल्पधारकांच्या म्हणण्यानुसार व पाठराखण करणारा तसेच म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी कारणे दाखवा नोटीस दि.२०/०९/२०२४ रोजी प्रकल्पाला पाठराखण करणारा देण्यात आला आहे.

तसेच म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी, तानाजी यादव व क्षेत्र अधिकारी यांना विचारणा केली असता ते एका सामान्य व्यक्तीला उत्तर देते की, तुमच्या तक्रारीवरती आम्ही कार्यवाही करायला बसलो नाही .अशा प्रकारची अरेरावीची उत्तरे म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी दिली आहे.
१. सुरजागड लोहखनिज प्रकल्प केळझर व राजूरा मानिकगढ़ रेल्वे साईडींगवर लोहखनिज हाताळणी व लोडींग करतेवेळी हवेमध्ये सुक्ष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. तिथे कुठलेही पर्यावरण यंत्र लावण्यात आलेले नाही. पर्यावरण कायद्याचे सरासर उल्लंघन होत आहे.
२. सुरजागड लोहखनिज प्रकल्पाद्वारे लोहखनिज संकलन केंद्रामध्ये लोडींग अनलोडींग हाताळणी करतेवेळी खूप मोठया प्रमाणात घातक वायू प्रदूषण होत आहे, तिथे प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. पर्यावरण कायद्याचे सरासर उल्लंघन होत आहे.
३. लोहखनिज उत्खनन करते वेळी बॉम्ब ब्लास्टिंगमुळे हवेमध्ये सुक्ष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्याअंतर्गत उपाययोजना होत नाही.
४. लोहखजिन हाताळणी करतेवेळी हवेमध्ये सुक्ष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्याअंतर्गत उपाययोजना होत नाही?
५. लोहखनिज खाणीतून निघणा-या लोहखनिज मधून निघणारा ओवर बर्डन हाताळणी करते वेळी हवेमध्ये सुक्ष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. तिथे कुठलेही पर्यावरण कायद्याअतंर्गत उपाययोजना होत नाही.
६. लोहखनिज व खाणीतून निघणारे ओवर बर्डन ट्रक व हायवा गाडीमध्ये हाताळणी करते वेळी हवेमध्ये सुक्ष्म कण उडत असल्यामुळे पातक वायू प्रदूषण होत आहे. तिथे कुठलेली पर्यावरण कायद्याअंतर्गत उपाययोजना होत नाही.
७. जड वाहतूकीद्वारा कायद्याचे उल्लंघन करून वाहतूकीमुळे सुरजागड लोहखनिज प्रकल्पापासुन एटापल्ली, आलापल्ली, गोंडपिपरी, आक्सापूर, पोभूर्णा, केळझर, कोठारी, बामणी या गावातील रस्ते व आजूबाजूचा परिसर लोहखनिजाचे हवेमध्ये उडते सुक्ष्म कणामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाययोजना होत नाही.
८. लोहखनिज खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव्य खाणीला लागून असलेल्या नाल्याद्वारे जंगलातून पामुलगौमत या नदीमध्ये सोडत असल्यामुळे घातक जल प्रदूषण होत आहे. तिथे कुठलेही पर्यावरण कायद्याअंतर्गत उपाययोजना होत नाही.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था, चंद्रपूर संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक कार्यालय, प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांना मेसर्स लॉयट्स मेटल व एनर्जी लिमिटेड सुरजागड, लोह खनिज खाण तह. ऐटापल्ली, जि. गडचिरोली या प्रकल्पाद्वारे घातक वायू, ध्वनी व जल प्रदूषण होत असल्यामुळे वन्यप्राणी व वन्य वनस्पती नष्ट होत असल्याची लेखी तक्रार व पर्यावरणाला नुकसान होणारे पुरावे देवून सुध्दा व मुद्देशीर तक्रारीमध्ये मुद्दे नमूद करून दिले असतांना तेथे मोका पंचनामा सरासर खोटा बनविण्यात आला.
तक्रारीमध्ये होत असलेल्या पर्यावरण नुकसानी बाबतची कुठलाही उल्लेख केलेला नाही म्हणून पर्यावरण हा नागरिक, वन्य प्राणी, वन्य वनस्पती, पक्षी व पाळीव प्राणी यांचा मुलभूत अधिकार असतेवेळी यांचे अधिकार नष्ट करण्याचा प्रयत्न म.प्र.नि. मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक कार्यालय, प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव व क्षेत्र अधिकारी करीत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे या अधिका-यांवरती उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशिर निलंबणाची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.



