Home Social ग्रामपंचायत सावरी (बिडकर) येथे वृक्षारोपण तथा वृक्षदिंडी…

ग्रामपंचायत सावरी (बिडकर) येथे वृक्षारोपण तथा वृक्षदिंडी…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी..

     पंचायत समिती चिमूर अंतर्गत येत असलेल्या मौजा सावरी (बिडकर) ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून वृक्षाचे महत्त्व गावकऱ्यांना समजावून सांगणारी वृक्षदिंडी गावातून काढण्यात आली.

          वृक्षदिंडीच्या माध्यमातून झाडांच्या महत्वाबाबतचे नारे लावण्यात आले व गित म्हणण्यात आले.मानवी जिवनात झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे वृक्षदिंडी विषद करीत होती..

          वृक्ष दिंडीचे समापन झाल्यानंतर गावातील आवश्यक जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली.

           याप्रसंगी सावरी ग्रामपंचायतचे सरपंच लोकनाथ रामटेके,ग्रामपंचायत उपसरपंच निखिल डोईजळ,ग्रामपंचायत कर्मचारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक बुद्ध रत्न शेन्डे,प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,शिक्षिका, गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता..