Home Social सहज सुचलं सखी मंचच्या सहसंयोजिकापदी भंडाराच्या प्रख्यात कवयित्री अंजली खंडाईत यांची नियुक्ती!..

सहज सुचलं सखी मंचच्या सहसंयोजिकापदी भंडाराच्या प्रख्यात कवयित्री अंजली खंडाईत यांची नियुक्ती!..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

       सामाजिक,साहित्यिक, क्रीडा, शैक्षणिक व कला क्षेत्रातील नवोदित महिला व तरुणींना सदैव प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं सखी मंचच्या सहसंयोजिका पदी भंडारा येथील मधूर व गोड आवाजाच्या गायिका तथा सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या प्रख्यात कवयित्री अंजली शशांक खडाईत यांची आज नियुक्ती करण्यात आली.

        सदरहु नियुक्ती विदर्भातील नागपूरच्या योग शिक्षिका तथा समाजसेविका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे,पथ्रोटच्या जेष्ठ लेखिका व सेवानिवृत्त शिक्षिका विजया भांगे,सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, हैदराबादच्या विजया तत्वादी व भद्रावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रजनी रणदिवे यांनी केली आहे.

        कवयित्री अंजली खंडाईत यांचे मुळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव असून सध्या त्या़चे वास्तव्य भंडारा येथे आहे.

        त्या Msc.Bed (Maths)DMlT आहे. गायनासोबतच त्यांना समाजसेवेची फार मोठी आवड आहे.साहित्य क्षेत्रातही त्यांचे आजपर्यंत मोलाचे योगदान ठरले आहे.त्यांच्या नांवे गडचिरोली येथील नाट्यश्री उत्कृष्ट कवी हा पुरस्कार आहे.या शिवाय कला व सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार खंडाईत यांना विदर्भातील सामाजिक संस्थेकडून बहाल झाले आहे.

         त्यांनी गेले काही वर्ष एका विद्यालयातून विद्यार्थ्यांना सुसंस्कृत घडविण्याचे पवित्र कार्य देखील केले आहे.एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांची भंडारा जिल्ह्यात ओळख आहे.

        कवयित्रि अंजली यांचा स्वभाव अतिशय शांत व मनमिळाऊ असून समाजसेविका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी दिलेली सहज सुचलं सखी मंचच्या सहसंयोजिका पदाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू अश्या त्या नियुक्ती झाल्यानंतर या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या.

        दरम्यान त्यांच्या निवडीचे विदर्भातील किरण दिप महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका ॲड.अंजली गुंडावार , सेवानिवृत्त शिक्षिका संजीवनी धांडे, जेष्ठ लेखिका सविता कोट्टी, मृणाल कांबळे,प्रा.वैशाली राऊत, सुपरिचित कवयित्री मंगल मिसाळ, जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार,समाजसेविका चंदा कामडी, अर्चना चावरे,अधिवक्ता हिमानी वाकुडकर, सोनाली चंदनखेडे,सरोज हिवरे,वैजयंती गहुकर,प्रा.सुनंदा पाटील,सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार, मीनाक्षी गुजरकर,कोकीळा पोटदुखे, कविता जुमडे, विद्या पिंजरकर, डॉ.सुचिका बुक्कावार,अर्पना चिडे ,शिवानी झाडे,चैताली आतराम,श्रध्दा परिमल,व सहज सुचलं सखी मंचच्या मुख्य संयोजिका ॲड.सारिका टेंभरे यांनी त्यांचे नियुक्तीचे स्वागत केले आहे.