शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा करबडा येथील कचराबाई अरुण भरडे या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले होते.सदर घटनेनंतर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी भरडे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते आणी लगेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले होते.
आज दिनांक 5 जून रोजी मृतक कचराबाई भरडे यांच्या कुटुंबियांना 9 लक्ष रुपयाचे धनादेश देण्यात आले.
यावेळी अरुणजी भरडे,भाजपा नेते ओमप्रकाश गणोरकर,सातारा ग्रामपंचायत सरपंच गजानन गुळधे,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर,क्षेत्रसहायक अमोल कवासे,वनरक्षक जिवतोडे आदी उपस्थित होते.



