छत्रवानी परिवार तर्फे सिंदवाही आठवडी बाजारात ठंड पानी वाटप..

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

 

चंद्रपुर :-

     सिंदवाही लोनवाही नगरपंचायत येथील आठवड़ी बाजारात छत्रवानी परिवारा तर्फे पानपोई लावण्यात आली.गेल्या काही दिवसांपासुन चंद्रपुर जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झालेली असुन उन्हामुळे नागरीकांच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच छत्रवानी परिवार तर्फे पाणपोईच्या माध्यमातुन नागरीकांची तहान भागविण्यात येणार आहे.सदर उपक्रम अनेक वर्षों पासून छत्रवाणी परिवार राबवित आहे.

       चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असुन ब्लॉक सिटी म्हणुन प्रसिध्द आहे,दरवर्षीच चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान देशातील टॉप 10 मध्ये असते,यावर्षीही तापमानात प्रचंड वाढ झालेली असताना आठवडी बाजार करण्यासाठी नागरीकांना दुरदुरून सिंदवाही येथे यावे लागते आहे.

        मात्र वेळोवेळी सोबत पाणी घेवुन येणे शक्य नसल्याने पाण्यासाठीही नागरीकांना पैसे मोजावा लागत आहे,ग्रामीण भागातुन आलेल्या नागरीकांना थंडगार पाणी पिण्यास मिळावे यासाठी छत्रवानी परिवारा तर्फे पानपोई लावण्यात आली.

        सामाजिक कार्यकर्ते बलराम छत्रवानी,श्याम छत्रवानी, राकेश छत्रवानी यांनी भाग घेतला असून सदर लोकोपयोगी उपक्रमाचे नांगरीकांडुन स्वागत केल्या जात आहे.