प्रयत्नामध्ये सातत्यता ठेवा,यश तुमचेच आहे : प्रा.सचिन थोरवे.. — आळंदीत मल्टी-टेक इन्स्टिट्यूटच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : गुणात्मक स्पर्धेत विद्यार्थ्यांना स्वतःला स्वतःच सिद्ध करावे लागते.या पुढील काळात तुम्हीच तुमचे मार्गदर्शक असणार आहात.त्यामुळे जीवनाला आकार देण्याची संधी निर्माण झालेली आहे,प्रयत्नामध्ये सातत्यता ठेवा,यश तुमचेच आहे असे प्रतिपादन मल्टी-टेक इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.सचिन थोरवे यांनी केले.

      आळंदी येथील मल्टी-टेक इन्स्टिट्यूट मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मल्टी-टेक इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.सचिन थोरवे, संचालिका स्वाती थोरवे, इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, डॉ. सुनील वाघमारे, पत्रकार दिनेश कऱ्हाडे, शैलेश सावताडकर उपस्थित होते.

      यावेळी मार्गदर्शन करताना विठ्ठल शिंदे म्हणाले की आळंदीत इतकी मुले घडविणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. एखादी संस्था काढणे सोपी असते; पण आव्हाने स्वीकारून ती चालविणे कठीण असते. प्रा.सचिन थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टी-टेक इन्स्टिट्यूट गेल्या बावीस वर्षांचे काम आळंदी आणि पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद आहे.

      मुलांना मार्गदर्शन करताना डॉ सुनील वाघमारे यांनी नवीन तंत्रज्ञान तुमच्या हाताशी आहे. त्याचा उपयोग करून प्रगती करावी. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्यातच करियर करावे. मित्र-मैत्रिणींनी क्षेत्र निवडले म्हणून मी पण निवडले असे करू नये. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करा. नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक बनून अनेकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करा, असा मोलाचा सल्ला डॉ.वाघमारे यांनी दिला.