दर्यापूर पंचायत समितीचा अफलातून कारभार… — एकाच लाभार्थ्यांला दोनवेळा घरकूलाचा लाभ… — शासनाची फसवणूक….

युवराज डोंगरे/खल्लार

दर्यापूर पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे एकाच लाभार्थ्यांला दोनवेळा घरकूलचा लाभ मिळाला असून याबाबतची तक्रार करुनही दोनवेळा घरकूल लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर दर्यापूर पंचायत समितीच्या घरकूल विभागाशी संबंधित असलेल्या अभियंत्यांने धनादेश टाकला असून शासनाची फसवणूक केली आहे.

दर्यापूर पंचायत समिती मधिल वडनेर गंगाई येथील सुधीर जगन्नाथ वानखडे यांना सन २०११-१२ या साली घरकुलाचा लाभ मिळाला होता.तरीही पुन्हा त्याच लाभार्थ्यांला पुन्हा घरकूलचा लाभ मिळाला आहे. एवढेच नाही तर पुन्हा घरकूल लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आतापर्यंत एक लाख रुपये टाकल्या गेले असून त्याची उचल देखील संबंधित लाभार्थ्यांने केली असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबतची लेखी तक्रार विद्यानंद बलदेव वानखडे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती, दर्यापूर यांच्याकडे दि २३ मार्च २३ ला केली होती मात्र तक्रार करुनही दोनवेळा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर दर्यापूर पंचायत समितीच्या संबंधित विभागातील अभियंत्यांने ४० हजार रुपयांचा धनादेश टाकला आतापर्यंत सुधीर जगन्नाथ वानखडे या लाभार्थ्यांच्या खात्यावर दि १६ सप्टेंबर २२ ला, १५ हजार, दि १२ डिसेंबर २२ ला ४५ हजार रुपये तर दि २७ मार्च २३ ला ४० हजार रुपये टाकले असे एकुण एक लाख रुपये टाकले गेले आहेत.

स्थापत्य अभियंत्याचे लक्ष का नाही?

दर्यापूर पंचायत समिती मधिल घरकुल विभागाशी संबंधित असलेले सहाय्यक स्थापत्य अभियंता परमेश्वर बानोडे हे मागिल १० वर्षापासून दर्यापूर येथेच कार्यरत आहेत.त्यांच्या हाताखाली कंत्राटी पद्धतीने काम करणारे ७ ते ८ ग्रामिण गृहनिर्माण अभियंता आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येक अभियंत्यांकडे पाचशे ते सहाशे फाईल आहेत. परंतु वडनेर गंगाई मधिल अभियंता व बानोडे यांच्या खास मर्जीतील असलेल्या विनीत बिजवे या अभियंत्यांकडे २२०० फाईल असल्याची माहिती समोर आली असून बानोडे व बिजवे या दोघांची मिलीभगत असून यासाठी ते एकाच लाभार्थ्यांना दोनवेळा घरकुल देऊन शासनाची फसवणूक करीत आहेत.याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर धनादेश टाकून दुसऱ्यांदा घरकूलचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या सुधीर वानखडे यांच्या खात्यावर धनादेश टाकताना सहाय्यक स्थापत्य अभियंता परमेश्वर बानोडे यांचे लक्ष का गेले नाही हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच परमेश्वर बानवडे व विनीत बीजेवे सहाय्यक स्थापत्य अभियंत्यास १० वर्षापासून दर्यापूर पंचायत समिती मध्येच परमेश्वर बनवले आहेत याला कोणाचे अभय आहे एवढेच नव्हे तर डबल घरकुलधारक बापूराव पुंडलिकराव पळसपगार यांनी इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २००६- २००७ व पुन्हा डबल वरील नाव बापूराव पुंडलिक पळसपगार सन २०१४-२०१५ या एकाच लाभार्थ्यांना डबल लाभ मिळतो मात्र खरे लाभार्थी वंचित आहे सरकार मायबाप खरा लाभार्थ्यांना डावलून याला खरोखरच जबाबदार असेल वरील दोन अभियंता परमेश्वर बानोडे व विनीत बिजवे तसेच ग्रामसेवक घुगे व त्याच गावचे सरपंच उपसरपंच या डबल लाभ घेणाऱ्यांमध्ये हे एवढे पदाधिकारी सामील आहे शासनाने लाखो रुपयाचे नुकसान विकास लाभार्थ्यांना मात्र संतोष श्रीराम लाजूरकर यांना सन २०२१- २२ लाभ मिळाला व या अगोदर पुन्हा लाभ मिळाला असे कित्येक लाभार्थी या वडनेर गंगा मध्ये डबल लाभधारक आहेत अशी अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांचे खंदे समर्थक आठवले यांनी केली आहे तसेच बंडू सोनवणे सुमन शेंडे काशीराम मोकळकर या तीन लाभार्थीचे घर मात्र चोरीला गेले आहे कारण या तीन व्यक्तींनी घराला एकही वीट लावली नाही प्रत्येकी एक लाख चाळीस हजार रुपये ची उचल करून घेतली आहे मात्र घर सद्यस्थितीत चौकशी केली असता घर फक्त रेकॉर्डवर रिकामी जागा आहे परंतु जागाही आहे किंवा नाही गावामध्ये अशी प्रत्येक चौका चौकात नागरिकांची चर्चा आहे शासन मायबाप मात्र खऱ्या घरकुलधारकांना डावलून ज्यांना खरोखरच आहे अशांना डावलून जे लाभार्थी वीस ते तीस हजार रुपये देतात यांनाच वडनेर गंगा येते घरकुलच्या लाभ मिळते अन्यथा ग्रामसेवक घुगे सरपंच उपसरपंच यांच्या प्रत्येक हप्त्या फाईलवर सह्या असतात मात्र स्वतः सचिव घुगे व सरपंच उपसरपंच मात्र डोळे लावून सह्या करतात काय अशी मागणी जोगेंद्र कवाडेचे खंदे समर्थक व तालुका माजी उपाध्यक्ष दीपक आठवले यांनी केली.