मिलिंद विद्यालय गौरखेडा येथील दहावीचा निकाल शंभर टक्के…

 

युवराज डोंगरे/खल्लार

खल्लार नजिकच्या गौरखेडा येथील मिलिंद विद्यालयाचा बोर्डाच्या परीक्षेचा वर्ग दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण परीक्षेला ३० विद्यार्थी बसले होते.

     त्यापैकी सर्वच्या सर्व पास झाले असून प्रथम क्रमांक कुमारी भूमिका श्रीकृष्ण सगणे, द्वितीय क्रमांक राशी किशोर वंजारी, तृतीय क्रमांक श्रेयस अरुण चारथड या विद्यार्थ्यांनी मिळविला.

      यासह विशेष प्राविण्य श्रेणीत ७, प्रथम श्रेणीत १६ तर द्वितीय श्रेणीत ९ विद्यार्थी आले आहेत. शाळेच्या शंभर टक्के निकालाबाबत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव अभ्यंकर ,संस्थेचे सचिव क्षितिज अभ्यंकर यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील गणमान्य व्यक्ती यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कौतुक केले आहे.