Home Crime पोलीसांनी अवघ्या १२ तासात घरफोडी प्रकरणात आरोपीस केली अटक…

पोलीसांनी अवघ्या १२ तासात घरफोडी प्रकरणात आरोपीस केली अटक…

सुनिल हिंगणकर 

  जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :- दिनांक ०१/१०/२०२५ रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथे फिर्यादी यांनी रिपोर्ट दिली की. दिनांक ०१/१०/२०२५ रोजी चे रात्रौ १/३० वाजता दरम्यान अनोळखी चोरटयाने फिर्यादीचे घराचा मागील दरवाजा तोडुन आत प्रवेश करून घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत असतांना घराचा मागील दरवाजा न तुटल्याने सदर चोर हा तिथुन पळून गेला. अशा रिपोर्ट वरून पो.स्टे. वरोरा येथे अप क. ६५६/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४), ६२ भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.

         सदर गुन्हा दाखल होताच वरोरा पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवुन केलेल्या तांत्रीक तपास तसेच गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपी नामे दिवाकर उर्फ देवा भिमराव गोलकोंडावर वय २९ वर्ष धंदा मजुरी रा. देवाळा (दाताळा) ता. जि. चंद्रपूर ह. मु. शिवाजी नगर भद्रावती ता. भद्रावती जि. चंद्रपूर या ताब्यात घेवुन सदर गुन्हयाबाबत विचारपुस करून सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सदर आरोपीस अटक करून आरापीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड गाडी क्र.एम.एच. ३४ सी.एफ. ००६० कि.अं.६००००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

        सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर,अप्पर पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर,पोलीस उपविभागीय अधिकारी सा., वरोरा तसेच मा.पो.नि. अजिंक्य तांबडे सा.यांचे मार्गदर्शनामध्ये सपोनि. शरद भस्मे, पो. हवा. संदीप मुळे, प्रशांत नागोसे, दिलीप सुर, अमोल नवघरे, सुखराज यादव पो. अं. विशाल राजुरकर, मनोज ठाकरे, सौरभ कुलथे, महेश गावतुरे यांनी केली.