“अहो आम्ही विचारच करत नाही, केला तरी गप्प बसतो.आमच्या नकली पदव्याचे ज्ञान चार भिंतीत पाजळत बसतो.ऐकणारे,बोलणारे आलटून पालटून तेच….
पुन्हा आम्ही RSS ला पराभूत करण्याची भाषा करतो.कोणत्या आधारावर?,त्याच त्याच बैठाकावर बैठका..या बैठकातून निष्पन्न काहीच नाही…..
तेच तेच विषय पाजळत बसून चर्चा वर चर्चा करण्यातच आम्ही केवळ 2014 पासून स्वतःच्या जीवनाच्या संध्याकाळी काही जगण्याची उमेद टिकवून ठेवण्यासाठी अर्थात स्वतःच्या वैचारिक संघटनांचा ढाचा न ढळू देता त्याच मानसिक वर्तुळात समाधानासाठीच जगतोय का?
आता ज्यांची घरे,बंगले, गाड्या दारात उभ्या असतात. त्यांच्याकडून आता RSS ला पराभूत करण्याची भाषा शोभत नाही.
आता ज्यांचे जीवन सर्वांगाने होरपळत आहे.आतून बाहेरून जळतो आहे.तोच एखादा किंवा यासारख्यांची एकजूटच या RSS ला कायम गाडल्याशिवाय राहणार नाही.
जगाचा इतिहास आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी ध्येयवेडाने झपाटलेल्या ” रुसो ” ची मुले अनाथालयात वाढली. परंतू , रुसोचे छोटे,छोटे लेख आणि विषमतेला कायम गाडणारी जागृतीचे वैचारिक पुस्तके.जनतेनी स्वखर्चाने छापुन वाटली,पत्रके वाटली..
असेच मोन्टेस्कीयू ,दीदेरो, व्हाल्टेअर यांच्यासारख्या विचारवंतांनी 95 % सामान्य जनतेच्या मोर्चाच्या नेतृत्व केल्यामुळेच बॅस्टील तुरुंगाचा पाडाव होऊन पुढे फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी झाली.!
“आपल्या भारतात सुद्धा यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. “
—-मार्कंडेय काटजू ( सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती )
आम्ही आमच्या देशाचे सर्वच समतावादी महापुरुषांच्या प्रतिमा आणि पुतळ्याला हार घालू घालू आम्ही हरलो.परंतू ,तरी सुद्धा स्वतः रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आम्ही होत नाही!
एकटा सोनम वांगचूक RSS,मोदी,शहाच्या अरेरावीला नमत नाही.!
ही ऊर्जा कुठून येते?
ऊर्जा येते,ज्यांना आम्ही अंतकरणातून आदर्श मानलं.त्या आदर्शाने माझ्यासाठी,देशासाठी,मानवतेसाठी सर्वस्व अर्पण केलं.त्याची जाणीव मी त्यागातून,संघर्षातून,कृतीतून सिद्ध करतो.म्हणून ऊर्जा मिळते.
जे जे महापुरुषांच्या विचार आणि आचाराशी समान ठराविक अंतर ठेऊन जगत आले. त्यांनीच स्वतः सुरक्षित राहून आपण चळवळीतल्या वळवळीचा देखावा निर्माण केला आहे.
केवळ प्रिंट मीडियाने दखल घेतली नाही,आमचे नाव आणि फोटो आले नाही म्हणून नाराजी व्यक्त करणाऱ्यांकडून क्रांतीची अपेक्षा फोल आहे!
आजकाल ग्रंथाची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या पुरस्कारासाठीच लिहिल्या जाते की काय अशी आता शंका यायला लागली. म्हणूनच की, 10%, 20% 30% 40% 50% डिस्काउंट देऊन सुद्धा पुस्तकं खपत नाहीत. असं का?
जर त्या ग्रंथातून जागृतीचे “शाब्दिक हायड्रोजन बॉम्ब ” बाहेर पडत नसतील. तर कोण त्या पुस्तकांना विचारतो.?
“अख्खा देश अवघ्या 11 वर्षात RSS ने गीळंकृत केलाय, तरी आमची तीच एकमेकांची पाय ओढणारी खेकडेवृत्ती. आमच्या आमच्याच डबक्यात आम्ही डराव,डराव करत बसायचं!
” येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश एका संविधानिक स्वातंत्र्यात प्रवेश करतो आहे. पूर्वी आमचा देश कधीच स्वतंत्र नव्हता असं नाही.परंतू,ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो.याचा विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे. आणि 26 जानेवारी 1950 रोजी मिळणारे संविधानिक स्वातंत्र्य जर आम्ही गमावून बसलो.तर ते आम्ही पुन्हा कधीही.मिळवू शकणार नाही!,या कल्पनेनेच माझे काळीज चर्रर्रर्रर्र होत आहे. “
—– डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( संविधान सभेतील 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भाषणातला शेवटचा इशारा )
या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सूचक इशाऱ्यांची गंभीर जाणीव किती लोकांना आहे?
ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता नाही,ज्याला दोन वेळचे पोट भरण्याची व्यवस्था नाही.अशाच व्यक्ती आणि व्यक्ती समूहाला वरील इशारा समजतो.साडी,माडी,गाडीत राहणाऱ्यांच्या विकृत मेंदूत सुद्धा हा गंभीर इशारा घुसू शकत नाही.
आज 2025 हे RSS चे शताब्दी वर्ष चालू आहे. 2014 च्या EVM द्वारे सुवर्णसंधी लाभली आणि लगेच ते कामाला लागले.CJI ( Judiciary) , CAG, RBI, CBI, NI, CEC, संसद,विधानमंडळे,राज्यसरकारे,राज्यपाल,विद्यापीठे,महाविद्यालये, शैक्षणिक अभ्यासक्रम,प्रसार माध्यमे,धार्मिक मंदिराची उभारणी,इत्यादी सर्व क्षेत्रे या RSS ने गिळंकृत केलेली असताना…..
आम्हाला वरील गंभीर सूचक इशारा नकली पी.एच.डी. मुळे समजत सुद्धा नाही!
3 वर्षांपूर्वी तीन कृषी काळ्या कायद्याविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी यशस्वी आंदोलन केले.परंतू ,पुरोगामी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी किंवा संघटनांनी परिणामकारक गंभीर दखल घेतली नाही..
मणिपूर 800 दिवसापासून जळत असताना पुरोगामी महाराष्ट्राने कधी लाखोंचा मोर्चा त्या आदिवासी बंधूच्या अन्यायाच्या विरोधात कधी काढला नाही.
खुद्द गडचिरोली जिल्ह्यातील आदिवास्यांना हुसकावून लावण्यासाठी भांडवलधार्जिन्या सोलार प्लांटसाठी जमीनी देण्याचा उघड कट चालू असताना पुरोगामी महाराष्ट्र शांतच आहे!
एकटा सोनम वांगचूक देशाच्या पर्यावरण संरक्षणासाठी, चीनने बळकावलेल्या प्रदेशासाठी संघर्ष करतोय.तर त्यांना तुरुंगात टाकल्या गेले…
परंतू ,स्वतःला पुरोगामी समजणारा महाराष्ट्र अजित पवार,एकनाथ शिंदे,फडणवीस,उद्धव ठाकरे,राज ठाकरे,शरद पवार यांच्यातील शाब्दिक कोट्याचा आनंद लुटतोय……
चळवळ जेंव्हा डबघाईला येते,तेंव्हा खऱ्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने सर्वात पुढे होऊन नेतृत्व करावे लागते.जेंव्हा चळवळ कोमातून जोमात येते,तेंव्हा नेत्याने किंवा कार्यकर्त्याने सर्वात मागे असावे लागते.वासरात लंगडी गाय शहाणीप्रमाणे.श्रेयावादासाठी संघर्ष कधीही करायचा नसतो. हीच तत्वप्रणाली RSS नेती केवळ स्वीकारलीच नाही तर ती अमलात आणल्यामुळे आज 100 वर्षात तीची मुळे मजबूत दिसतात!
म्हणून आमच्या संविधानवादी शक्तीचा पराभव होताना दिसतो आहे!
” एक दिन चक्कु चलानेवाला गुंडा देश चलाता है, तो उस देश का क्या होगा.?”
(वरील डायलॉग इंडियन सिनेमातला आहे.)
आज आमच्या देशाची परिस्थिती अजिबात वेगळी नाही.
मग हे आम्ही केवळ बघतच बसणार का?
आता आमच्या पदव्या खऱ्या अर्थाने पाजळायची वेळ आलेली आहे.नाहीतर तीला जाळायची वेळ आलेली आहे..
कारण…….
ज्ञसर्व संविधानिक संस्था नष्ट करण्यात संविधानविरोधी शक्ती यशस्वी होताना दिसत आहे. त्या महापुरुषाच्या त्या सूचक ईशाऱ्याला गांभीर्याने घेऊन सार्वजनिक क्रांतीची आवश्यकता आहे. बाकी सर्व गौण..
आवाहनकर्ता आणि लेखक..
अनंत केरबाजी भवरे
( संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689)



