शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चंद्रपूर शहरातील गुरुकुंज उद्यान आक्केवार वाडी निर्माण नगर येथे सुरू असलेल्या योग वर्गाचा 9 वा वार्षिक सोहळा तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन काल करण्यात आले होते.
विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुभाष कासंगोट्टूवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुकुंज उद्यान येथे मोदी सरकार के यशस्वी 11 वर्ष ‘संकल्प से सिद्धी’ तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडनविस यांच्या वाढदिवस सप्ताह निमित्त एक पेड़ माँ के नाम या कार्यक्रमाचे आयोजन भारती जनता पार्टी महिला मोर्चा चंद्रपूर जिल्हा सोशल मिडीयाच्या संयोजिका सुवर्णा ताई लोखंडे यांनी केले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बबनराव धर्मपुरीवार जेष्ठ नागरीक संघाचे माजी अध्यक्ष,सुधाकर श्रीपुरवार, भारत स्वाभिमानचे अध्यक्ष अशोक संगीडवार,पतंजली योगसमितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम राऊत, कुल निर्माण बहुद्देशिय संस्थेचे उपाध्यक्ष विजय लोखंडे,कुल निर्माण समितीचे सचिव विजय चिताडे,मुक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा मंजूश्री कासनगोटु्टवार,ज्ञानोदय ॲकॅडमीच्या प्राचार्य प्रज्ञा गंधेवार सिंधुताई चौधरी, शैलेष जुमडे माजी नगरसेविका शिला चव्हाण,माजी नगरसेविका माया उईके उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम राऊत यांनी केले.
4 वर्ष वृक्ष जोपासना केल्या बद्दल मंजुषा निमकर,भोलाराम सोनुले आशा मोसमवार,करुणा खोडे यांचा सत्कार करण्यात आला.या सोबतच योग शिक्षिका ज्योती राऊत,कविता वरभे,प्रतिभा रोकडे,कल्यानी येडे, मिनाक्षी रोहणकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.सदरहु कार्यक्रमाच्या आयोजक गुरुकुंज योग कक्षाच्या सुवर्णा लोखंडे,ज्योती राऊत,मंजुषा निमकर, कविता वरभे ह्या होत्या.
पार पडलेल्या कार्यक्रमाला मीनाक्षी जगम,भारती खडतकर,रोशनी कापसे,सुजाता राजुर्लेवार, रंजना मानुसमारे , कल्पना नाशिकर, प्रिया कांबळे, भावना खोडे, सुरेखा निमसटकर , छाया वाढई, ममता गटलेवार , सुनिता देवतारे आदिं महिला उपस्थित होत्या.



