हनुमान मंदिर कांद्री येथे गुरु पुजाने गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी.. — आई, वडील व गुरुजनांचा आदर करावा, गुरु शिष्य परंपरेचे स्मरण करा. – राजेंद्र बावनकुळे

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

कन्हान : – कांद्री येथे कोल माईंस खदान रोड वरील हनुमान मंदिरात शिवशक्ती डहाका मंडळ व शाहीर विक्रम वांढरे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु पुजन आणि विविध कार्यक्रम सादर करुन गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

            सोमवार (दि.३) जुलै ला गुरु पौर्णिमा निमित्य कोल माईंस खदान रोड येथील हनुमान मंदिरात शिव शक्ती डहाका मंडळ व शाहीर विक्रम वांढरे यांच्या संयु क्त विद्यमाने गुरु पुजन कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थि त महाराष्ट्र शाहीर परिषद नागपुर जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र बावनकुळे यांचा हस्ते जय संताजी नाऱ्याचे जनक लोकशाहीर वस्ताद स्व. श्री भिमराव बावनकुळे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात कर ण्यात आली. यावेळी राजेंद्र बावनकुळे यांनी उपस्थि तांना मार्गदर्शन करुन ” आई, वडील आणि गुरुजनां चा नेहमी आदर करावा, गुरुशिष्य परंपरेचे स्मरण करा ” , असा संदेश दिला. यावेळी गुरु पौर्णिमे च्या माध्य मातुन सर्व शाहीर लोकांनी आप आपल्या गुरु, वस्ताद चे गुण, गीत आणि युवा शाहीर ग्रुप चे दिलेर बावने, चेतन बावने, करण बावने यांनी शिवरायांचे गीत नागरि का समोर गायन केले. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरात प्रसाद वितरण करुन गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भोजराजजी घरझाडे, शालिकरामजी शेंडे, गिरधर बावने, निलेश वांढरे, भुपेश बावनकुळे, प्रफुल भनारे, वामन देशमुख, अशोक पाटील, मधुकर कांबळे, धर्मदास आपुरकर, हुकुमचंद ठाकरे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.