जिल्हा न्यायालय गडचिरोली ते एम.आय.डी.सी./ कोटगल गावाचे प्रवेशव्दार पर्यंतच्या हद्दीतील रहदारी, दुकाने, आस्थापना उद्यासाठी बंद राहणार…  — राष्ट्रपती यांच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाकडून आदेश…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

     भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचा एक दिवसीय दौरा कार्यक्रम हा निश्चीत झाला असुन दिनांक 05.07.2023 रोजी गडचिरोली शहरात आगमन होणार असून सदर दिनांकास गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील दिक्षांत समारंभ मध्ये माननीय राष्ट्रपती महोदया ह्या उपस्थित राहणार आहेत.

     सदर कार्यक्रमा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे संकट उत्पन्न होण्यास वा मानवी जिवितेला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्यास अथवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याच्या कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही सबब कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंध करणे आवश्यक असून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे इष्ट असल्याचे माझे निदर्शनास आले आहे. 

     संजय मीणा (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी, भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या दिनांक 05.07.2023 रोजीच्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील दिक्षात समारंभाच्या अनुषंगाने उपद्रव किंवा कोणतीही आशंकित संकटे उद्भवू नये म्हणून जिल्हा न्यायालय गडचिरोली ते एम.आय.डी.सी./ कोटगल गावाचे प्रवेशव्दार पर्यंतच्या हद्दीतील रहदारी, दुकाने, आस्थापना दिनांक 04 जुलै, 2023 चे रात्रौ 10 ते दिनांक 05 जुलै, 2023 चे दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत असलेल्या अधिकारान्वये निर्गमित केले आहेत. 

                तसेच आणिबाणीचे उपाय म्हणून सर्वसाधारणपणे सार्वजनिक किंवा त्यांच्या कोणत्याही सदस्यास कोणत्याही प्रकारची अग्नीशस्त्रे/ प्राणघातक शस्त्रे/लाइी / भाले / त्रिशुल / तलवारी / चाकू / खंजीर / लोखंडी सळया इत्यादी वस्तूंना बाळगण्यास प्रतिबंध राहील.

                सदर आदेश खालील वर्णीत व्यक्ती / अधिकारी/ कर्मचारी यांना लागु राहणार नाही.

                 1) पोलीस / सैन्य / निमलष्करी सैनिक/ शासकिय कर्मचारी ज्यांची सदर कार्यक्रमासाठी नियुक्ती

                      करण्यात आलेली आहे.

                2) सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाव्दारे संपादित केलेली वाहने / शासकिय वाहने / अग्निशामक

                     वाहने / ॲम्ब्युलन्स वाहने इत्यादी.

                3) उपरोक्त नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती / अधिकारी / कर्मचारी यांनी स्वत:चे ओळखपत्र /

                     प्राधिकृत पत्र सोबत बाळगावे.