कालापांढरीची शाळा भरते एका घरात.. मेळघाटचे विदारक चित्र: एकाच ठिकाणी एक ते आठ वर्ग… शिक्षण विभाग उदासीन: मेळघाटचा शिक्षणाचा दर्जा खालावला…

 

अबोदनगो चव्हाण

दखल न्युज भारत

चिखलदरा मेळघाट

प्रतिनिधी

चिखलदरा मेळघाट :- कोणत्याही समाजाची किंवा क्षेत्राची प्रगती शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही असे आजवरच्या इतिहासावरून लक्षात येते असं असूनही मेळघाटला शिक्षणाच्या बाबतीत जाणीवपूर्वक मागे तर ठेवले जात नाही ना असा सवाल आदिवासी बांधवांकडून केला जात आहे मेळघाटात अजूनही शिक्षणाच्या जशा सुविधा पाहिजेत त्या अजूनही पोहोचलेल्या नाहीत त्यामुळे मेळघाटची तरुण पिढी अज्ञानाच्या खाईत लोटले जात आहेत असे विदारक चित्र सध्या मेळघाटात उभे आहे चिखलदरा तालुक्यातील कालापांढरी या गावातील शाळा एक वर्षा अगोदर शाळेचे तीन पत्रे उडाली त्यामुळे या शाळेत शाळा भरवणे प्रशासनाला कठीण झाले मात्र एक वर्ष उलटूनही संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी जुनी इमारत दुरुस्त केली नाही किंवा नवीन इमारत या ठिकाणी उभारता आली नाही.

      एक वर्ष हा कालावधी काही कमी होत नाही तरीही प्रशासनाला या ठिकाणी कोणतीही तात्पुरते व्यवस्था सुद्धा करते आले नाही त्यामुळे या ठिकाणी काल 30 जून रोजी शाळा सुरू झाली पावसाळा सुरू झाला मात्र विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नाही शासनाकडून भाडेतत्त्वावर एक घर घेण्यात आले घरात सुद्धा एकच खोली या खोलीत सुद्धा विद्यार्थ्यांना बसण्याची चांगली सोय नसल्यामुळे कोणतेही विद्यार्थी या ठिकाणी यायला तयार नाहीत काल शाळेचा पहिला दिवस होता पहिल्या दिवशी फक्त पाच विद्यार्थी या ठिकाणी शाळेत हजर होते अशी विदारक परिस्थिती मेळघाटातील कालापंढरी येथे दिसून आली एकीकडे विद्यमान सरकार व केंद्र सरकार विकासाच्या वेगळेच चित्र दाखवत आहे मात्र मेळघाट सारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या सुविधा सुद्धा नाहीत आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी वर्ग खोल्या सुद्धा नाहीत असे विदारक चित्र सध्या मेळघाटात आहे तरी शासनाने या ठिकाणी तात्काळ शाळा बांधावी व संबंधित अधिकाऱ्यावर बांधकामाच्या कामात काम चुकार केल्यामुळे कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.

बॉक्स

कालापांढरी येथील शाळेवरील तीन पत्रे मागील वर्षी उडाले होते सध्या ही शाळा आम्ही पडली आहे व नवीन तीन खोल्यांचे टेंडर प्रोसिजर झालेली आहे प्रति खोली 11 लाख रुपये मंजूर झाले आहे या शाळेत एक ते आठ वर्ग असून 60 62 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशी माहिती चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामेश्वर माडवे यांनी बोलताना सांगितले.

बॉक्स

आमच्या कालापांढरी गावातील एका वर्षापासुन शाळा पडली आहे आणि दोनच शिक्षिका आहे एक ते आठ पर्यत शाळा आहे अजुन दोन शिक्षक पाहिजे आमच्या घराचे भाडे मिळाले नाही आम्ही आता आमच्या घरात शाळा भरवु देणार नाही.

कुसमा भुसुम शाळा व्यस्थापन समिति अध्यक्ष कालापांढरी