पैशाची बचत आणि जीवन विमा योजनेचा लाभ आजच्या काळाची गरज – पुजा कुरंजेकर

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

       भंडारा : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे व या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्याच्या समोर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आज या स्पर्धेच्या काळात पैशाची बचत करणे आवश्यक झाले आहे. कारण पैसा माणसाच्या जीवनात अतिशय आवश्यक आहे. पैसा असेल तर माणसाला आपल्या आयुष्यातील सर्व जीवनावश्यक गरजा पुर्ण करता येतात त्यासाठी या पैशाची बचत करणे फारच महत्वाचे असून जीवन विमा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा तसेच मुलांच्या पुढील भविष्यातील सुरक्षा जमापुंजी आजच रक्षित करण्यासाठी जीवन विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन नुकतेच एका कार्यक्रमात भारतीय आयुर्विमा महामंडळ नागपूर विभागातून महिलेत प्रथम स्थान भुषविलेली सीएलआयए प्रतिनिधी पुजा कुरंजेकर यांनी केले आहे.

         पैसा माणसाच्या आयुष्यात जितक्या वेगाने येतो त्यापेक्षा जास्त वेगाने खर्च होतो त्याचे कारण माणसाच्या इच्छा आकांक्षा वाढत राहतात.

         आज महागाईच्या काळात पैशाची बचत करणे जेवढे आवश्यक झाले आहे त्याच बरोबर माणसाच्या जीवनात विमा इन्शुरन्सला देखील फार महत्व आले आहे. विमा ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आज ग्रामीण भागातील गरीब लोकांना पैशाची बचत करण्यासाठी विमा इन्शुरन्स एक चांगला पर्याय आहे आणि तेही भारतीय आयुर्विमा महामंडळ विमा इन्शुरन्स पॉलिसी. आज देशातील सर्वात मोठी विमा इन्शुरन्स कंपनी मध्ये ग्रामीण भागातील लोकांनी बचतीच्या मार्गाने पॉलिसी काढावी ही आज काळाची गरज आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. विमा इन्शुरन्स पॉलिसी मध्ये गुंतविलेला पैसा कधीच बूडणार नाही त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील लोकांनी विमा पॉलीसी काढणे फायदेशीर ठरते. ग्रामीण भागात आज एक व्यक्ती कमवीत असतो व त्या व्यक्तीच्या कमाई वर त्याचा संपूर्ण कुटुंब पत्नी, मुलगा, मुलगी, आईं वडील अवलंबुन असते अशामध्ये त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्याचा संपूर्ण परिवार दुःखात असतो. अशावेळेस कोणताच व्यक्ती समोर येऊन मदत करीत नाही. सर्व नातेवाईक मित्रमंडळी दूर जातात. कारण परिवाराच्या उदरनिर्वाह साठी पैशाची गरज असते. दुःखाच्या अशा प्रसंगी सहारा देण्याचे काम व त्यातून मार्ग काढण्याचे काम फक्त एल आय सी विमा इन्शुरन्स पॉलिसी मुळे शक्य होते. विमा असेल तर दुःखाच्या क्षणी इन्शुरन्सच्या पैशातून मृत परिवाराला मार्ग काढता येतो. विमा इन्शुरन्स पॉलिसी फक्त मृत्यू झाल्यास त्याचा फायदा परिवाराला मिळायला हवा यासाठी काढली जात नाही तर ती एक बचतीचा मार्ग आहे. आज एल आय सी पॉलिसी काढणे फारच फायदेशीर ठरते कारण आज विमा इन्शुरन्स पॉलिसी वर दर चार ते पाच वर्षात मनीबॅक स्वरूपात काही पैसे वापस मिळतात. तसेच पॉलिसी काढल्यानंतर आपल्याला आवश्यकता असेल तर तीन वर्षा नंतर कर्ज देखील मिळते. विमा इन्शुरन्स कंपनी आपण बचत केलेल्या पैशावर बोनस देखील देत असते.

        ग्रामीण भागातील लोकांनी विमा इन्शुरन्स पॉलिसीचे महत्व समजून भारतीय आयुर्विमा महामंडळ पॉलिसी सर्वांनी काढावी व आपल्या परिवाराला आतापासूनच सुरक्षा कवच प्रदान करण्यात यावे असे विनंती आवाहन भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली विभागातील सीएलआयए पुरस्कृत पुजा नरेश कुरंजेकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात संबोधन केले आहे.