भरपूर पाऊस पडून माझ्या बळीराजाच्या जिवनात सुख समृद्धी लाभु दे…  — माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री लक्ष्मी नृसिंह चरणी साकडे..

 

नीरा नरसिंहपूर दिनांक:4

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार

श्री लक्ष्मी नृसिंह जयंतीच्या निमित्ताने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निरा नरसिंहपूर येथील पुरातन काळातील प्रसिद्ध देवस्थान श्री लक्ष्मी नृसिंह चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

      निरा व भिमा या नदीच्या संगमावर वसलेले हे मंदिर अतिशय पुरातन आसुन विविध पुराना मध्ये या मंदिराचे वेगवेगळे दाखले आपणांस पहावयास मिळतात.लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे महात्म्य इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्धी आहे.त्यामुळे एक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र म्हणून या देवस्थानची ओळख असल्याने दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी नतमस्तक होत असतात.

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आपल्या प्रत्येक राजकीय निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरात नारळ वाढवून करत आसतात. तसेच आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये विशेष बाब म्हणून कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करून याठिकाणी अतिशय उत्तम सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे आमदार भरणे व लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध आहेत.लक्ष्मी नरसिंह जयंती निमित्त आमदार भरणे यांनी लक्ष्मी नृसिंहाची विविधत पुजा करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

         या प्रसंगी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की,सध्या आपला शेतकरी बांधव चोहो बाजूंनी आडचणीत आला आहे.कधी कधी तर आनेक संकटे बळीराजाच्या पाचवीला पुजलेली आहेत.विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी सध्या ना उमेद झाला आहे.

       त्यामुळे यंदा पाऊस-पाणी चांगला पडून माझ्या बळीराजाचे शेत-शिवार पुन्हा एकदा भरभरून पिकु दे तसेच शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकरी बांधवांच्या जिवनात समृद्धी येऊ दे अशा प्रकारचे साकडे आमदार भरणे यांनी श्री लक्ष्मी नृसिंह चरणी घातले.

        यावेळी देवस्थानच्या वतीने आमदार भरणे यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी देवस्थानचे अध्यक्ष तसेच सर्व ट्रस्ट, यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थ, प्रमोद दंडवते, अविनाश दंडवते, माजी सरपंच नरहारी काळे, ज्येष्ठ नेते श्रीकांत दंडवते,नरसिंहपूरचे विद्यमान सरपंच चंद्रकांत सरवदे, ऊप सरपंच आनंद काकडे, सरपंच श्रीकांत बोडके, माजी सरपंच विठ्ठल देशमुख,आरूण क्षिरसागर,संतोष शिरसागर, ग्रामपंचायत सदस्य व चित्रपट अभिनेते नितीन सरवदे, दत्ता कोळी, दशरथ राऊत, गौरव दंडवते, गणेश काकडे,कदम वस्ताद,महेश राऊत, नारायण दंडवते, समाधान सरवदे, शंकर राऊत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.