प्रमोद राऊत / तालुका प्रतिनिधी
लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या आदानी समुहातील महाघोटाळ्यासंदर्भात आपले नेते राहुलजी गांधी यांनी उठविलेला आवाज भाजपाने हुकुमशाही पध्दतीने दडपण्याचा प्रयत्न केला. राहुलजी गांधी भाजपा विरोधात थेट संघर्ष करत असताना भाजपाशी कोणत्याही पध्दतीची हात मिळवणी करणे अयोग्य आहे. या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणूकीमध्ये भाजप किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू नये अशा स्पष्ट सुचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या.
तरी देखील नुकत्याच संपन्न झालेल्या चंद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण उघड उघड भाजपसोबत हातमिळवणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला, ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधातली असून प्रदेश काँग्रेसच्या आदेशाला न जुमानणारी आहे. आपले हे कृत्य पक्षविरोधी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे आपल्याला चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे आणि आपला पदाचा प्रभार पुढील आदेशापर्यंत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात येत आहे. असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.