Home Social चिमूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…

चिमूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

      अखील भारतीय बौद्ध महासभा शाखा चिमूर,त्रिशरण महिला मंडळ,समता सैनिक दल,यांच्या संयुक्त विद्यमाने 69 वा अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

        तथागत भगवान गौतम बुद्ध,युगपुरुष-बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पुष्पहार व पुष्पगुच्छ करुन दिप प्रज्वलन करण्यात आले आणि त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.

        यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

       याप्रसंगी अध्यक्ष- सागर भागवतकर.उपाध्यक्ष- प्रशिक भैसारे,आशिष राऊत,सचिव- सुमेध सहारे,सहसचिव- मनोज राऊत,सचिन इंदूरकर, कोषाध्यक्ष- आकाश भगत,प्रगत सहारे,सदस्य गण- रामदास राऊत,शिवम सोरदे,प्रीतम राऊत,प्रतीक टेम्बुरकर,रवींद्र नंदेश्वर.आदी उपस्थित होते.