Home Maharashtra वाघाची दहशत,शेतकरी,मजूर,विद्यार्थी चिंताग्रस्त! — सतारा व बामनगाव परिसरात वाघांसह इतर वन्य...

वाघाची दहशत,शेतकरी,मजूर,विद्यार्थी चिंताग्रस्त! — सतारा व बामनगाव परिसरात वाघांसह इतर वन्य प्राण्यांचा वावर धोकादायक…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

        शेतकऱ्यांना शेतातील मालाची मशागत कशी करावी याची चिंता तर मजूरांना शेतात मजुरी करताना जिव गमावण्याची भिती आणि विद्यार्थ्यांना रस्त्यांनी येताजातांना हल्ल्याची भिती!..

      सर्वांचा मनात भिती आणि दहशत निर्माण करुन ठेवली ते हिस्त्र वाघानी! सदर हिस्त्र वाघ केव्हा कुणावर हल्ला करेल आणि कुणाचा जिव घेईल याचा नेम राहिलेला नाही.

       यामुळे हिंस्त्र वाघांचा बंदोबस्त करावा या संबंधाने मौजा सातारा आणि मौजा बामणगाव येथील नागरिकांनी संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी यांना निवेदन दिले.

       परंतु वनपरिक्षेत्राधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त काम करणारे वनपाल,वनरक्षक,वनमजूर यांनी हिंस्त्र वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचे दिसून येते आहे.

         याचबरोबर इतर वन प्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

      हिंस्त्र वाघांचा आणि इतर वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी मौजा सातारा व मौजा बामणगाव येथील नागरिकांनी केली आहे.