Home देशविदेश नागपूरच्या दिक्षाभुमीवर देशविदेशातील नागरिकांची रेकार्ड ब्रेक उपस्थिती तथागत भगवान गौतम बुध्दांच्या धम्माची...

नागपूरच्या दिक्षाभुमीवर देशविदेशातील नागरिकांची रेकार्ड ब्रेक उपस्थिती तथागत भगवान गौतम बुध्दांच्या धम्माची महानता अधोरेखित करतय… — भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती व्यक्त केली कृतज्ञता!

उपक्षम रामटेके 

   मुख्य संपादक 

        नागपूर येथील दिक्षाभुमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन हा विजयादशमीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा केला जातो,हा तो दिवस आहे जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या लाखो अनुयायांनी १४ आक्टोंबर १९५६ ला नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्म स्वीकारला होता. 

         म्हणूनच देशविदेशातील लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर एकत्र येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करतात आणि बौद्ध धर्माचा गौरव करतात. 

            काल झालेल्या ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशविदेशातील लाखो अनुयायांनी नागपूर येथील पवित्र दिक्षा भुमिला भेट देत तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

          धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दिक्षाभुमीवर लाखो पुस्तकांची होणारी विक्री इतिहासात नोंद करणारी आहे.

          भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्म क्रांतीला अनुसरून दिक्षा भुमीवर होणारे वैचारिक मंथन,वैचारिक मार्गदर्शन, देशविदेशातील नागरिकांना नवसंजीवनी देणारे ठरते आहे,उर्जा देणारे ठरते आहे.म्हणूनच नागपूरच्या दिक्षा भुमीला उर्जा भुमी हे नाव देशविदेशातील बौद्ध अनुयायांनी आणि देशविदेशातील तत्ववेत्ता यांनी दिले आहे.

         तद्वतच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ही घटना भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. 

         धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दिवस अशोक विजयादशमीच्या दिवशी येतो,जो सम्राट अशोकाने कलिंग युद्धाच्या नंतर बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 

        हा भारतातील एक प्रमुख बौद्ध सण आहे,जो धम्म व्हील प्रमोल्गेशन डे (Dhammachakra Pravartan Din) म्हणूनही ओळखला जातो.या दिवशी दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.ज्यात बौद्ध धर्माशी संबंधित भाषणे होतात,त्रिशरण पंचशील घेतली जाते आणि सामाजिक विचारांवर चर्चा यांचा समावेश असतो. 

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या दिवशी त्यांना अभिवादन करतात आणि बौद्ध धर्माची तत्त्वे स्वीकारण्याचा निर्धार करतात. 

          याचबरोबर या दिवसाचे महत्त्व सांगणारे गीते,संदेश आणि शुभेच्छा आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात. या दिवशी डॉ.आंबेडकरांनी सुरू केलेली ही रक्तविहीन धम्मक्रांती सामाजिक विषमतेच्या विरोधातील लढा म्हणून पाहिली जाते.