निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : महाराष्ट्र शासन वन विभाग वतीने ०१ – ०७ ऑक्टोंबर वन्यजीव सप्ताहाला सुरूवात करण्यात आली. ०१ ऑक्टोंबरला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ.शाळा लवारी येथील विद्यार्थ्यांनी या सप्ताहात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेत विविध चित्रफलकांतून जनजागृती करण्यात आली.
भंडारा वन विभाग अंतर्गत वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय साकोली येथून बाईक रॅलीला सुरवात करून त्या मधून जैवविविधतेचा घटक असलेले वन्यप्राणी हे मानवी जीवनाचाही एक अविभाज्य घटक आहेत. या वन्यजीवांच्या निसर्गातील महत्वाविषयी त्यांच्या जागृतीविषयी माहिती व्हावी असा संदेश जनमाणसा पर्यंत पोहचावा हा त्यामागचा उद्देश आहे.
बाईक रॅलीने पी एम.श्री.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लवारी येथे जात विद्यार्थ्यांना जंगल क्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्याचे संरक्षण व संवर्धन व्हावे असा संदेश वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी देऊन बाईक रॅली समाप्त करण्यात आली.
वन्यजीव संरक्षण कायदा काय असतो आणि वन्य क्षेत्रातील प्राण्यांना इजा, धोका अथवा संकट निर्माण करणे यावर अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल होतो यांचे विविध चित्रे देखाव्यातून विद्यार्थी सुद्धा वन्य जीव विषयात रममाण झाले होते.
याप्रसंगी वन्यजीव सप्ताह निमित्त जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक तथा शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या शासकीय कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.



