हत्तीचा विधुत करंट लागूंन दुर्दैवी मृत्यु… — सिंदेवाही तालुक्यातील चिटकी येथील घटना… — वनविभागात खळबळ… — वनविभागाचे अधिकारी व त्यांची चमू,पोलीस अधिकारी व त्यांची चमू घटनास्थळी दाखल…

 

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

         चंद्रपूर जिल्हातंर्गत सिदेवाही तालुक्यातील मौजा चिटकी या गावाच्या शेत शिवारात एक जंगली नर हत्ती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

          ओडीसा राज्यातून छत्तीसगड राज्यानंतर महाराष्ट्रात दाखल झालेल्या नर हतीचा मृत्यू सिंदेवाही तालुक्यातील चिटकी परिसरात झाला असल्याने खळबळ उडाली आहे. 

            सविस्तर वृत्त असे की ओडीसा राज्यातून आलेला नर हत्ती गडचीरोलीच्या जंगल मार्गाने वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नंतर सावली,नागभीड तालुक्यात आला.मागिल एक महीन्यापासून सिंदेवाही तालुक्यातील जंगल परिसरात नर हत्तीचे वास्तव्य होते.

          सिंदेवाही वनपरिक्षेत्र विभागातंर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथिल नियत क्ष्रेत्र मुरपार बिटा मधील खाजगी क्षेत्रात आज दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी 8.00 वाजताचे दरम्यान अशोक पांडुरंग बोरकर यांच्या शेतात जंगली हत्ती मृतावस्थेत आढळून आला.

        मागील पंधरा दिवसांपुर्वी हा जंगली हत्ती सिंदेवाही तालुक्यातून ब्रह्मपुरी तालुक्यातील जंगल परीसरात गेला होता.अचानक दोन दिवसापूर्वी सिंदेवाही तालुक्यातील जाटलापुर,चिटकी, मुरपार जंगलात दाखल झाला.

         नर हत्तीचा मृत्यू चिटकी जंगला लगत एका शेतशिवारात विद्युत करंटने झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

            घटनास्थळाचा पंचनामा होत असून पुढील कारवाही वनविभाग करीत आहे.घटनास्थळी वनविभागाचे मुख्यस्वरक्षक जितेंद्र रामगांवकर व वनविभागाची चमू दाखल झाली असून पोलीस सुद्धा दाखल झाले आहेत.