ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे राष्ट्रीय सिकलसेल मिशन मोहिमेची सुरुवात.

धानोरा /भाविक करमनकर 

        सिकलसेल आजार नियंत्रणासाठी केंद्र सरकार मार्फत राष्ट्रीय सिकलसेल मिशन हाती घेण्यात आले. याची सुरुवात शनिवार 1 जुलै ला विशेष मोहिमेची सुरुवात दूरप्रक्षेपण ऑनलाईन प्रणाली द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.

       तरुणांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व्हावी तसेच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळावे या अनुषंगाने राष्ट्रीय सिकलसेल मिशन देशभरात राबविण्यात येत आहे.

     या मोहिमेचा शुभारंभ तालुका स्तरावर साईनाथ साळवे सदस्य रुग्णकल्याण समिती, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजभे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सखाराम हिचामी, डॉ फरीद लाखानी, डॉ सिमा गेडाम, डॉ मंजुषा लेपसे व ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दूरप्रक्षेपण ऑनलाईन प्रणाली द्वारे तालुक्यात सिकलसेल मिशनाचा शुभारंभ करण्यात आला.

      या कार्यक्रमाप्रसंगी सिकलसेल तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिकलसेल वाहक व ग्रस्त रुग्णांना सिकलसेल कार्डचे वितरण करण्यात आले.