आमचा ( जनतेचा ) नोकर ( संविधानिक मार्गाने ) असलेल्या मुख्य निवडणूक आयोगाने अट्टाहास करून विरोधाला न जुमानता EVM वरच निवडणुका घेऊन शेवटी आमच्या मताचा अनादर करून मूलभूत हक्काना केराची टोपली शेवटी दाखवलीच……..
जशी काही ही संपूर्ण व्यवस्थाच आमच्यावर उपकारच कर्ते आहें हे भासविले.
संपूर्ण लोकशाही शासन प्रणालीमध्ये सर्वात महत्वाचे आणि अत्यावश्यक मूलभूत हक्क म्हणजे निवडणुकीतील……..
मताचा अधिकार?
असतो,परंतू आमच्या देशात याचे महत्व सर्वसामान्यापर्यंत रुजल्या गेल्या नसल्यामुळे क्षुल्लक कारणापोटी,अमिषापोटी,एवढेच काय कुणी गोड बोलून थापा मारल्या तरी त्याला आम्ही भुलतो आणि देशाच्या विकासाची आमच्या हातात असणारी,पाच वर्षातून येणारी संधी अगदी सहजतेने कुठलाही विचार न करता दुसऱ्याच्या हातात देऊन मोकळे होतो………..
या प्रक्रियेलाच लोकशाही समजून आम्ही पाच वर्षासाठी पुन्हा रवंथ करत बसतो…..!
याच मानसिकतेचा लाभ येथील व्यवस्था आणि सर्वच राजकीय पक्ष उठवतात. असे कधीच होऊ नये.
म्हणूनच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की लोकशाहीतील तुमचा मताचा अधिकार”तुमच्या जिवापेक्षाही मोलाचा आहे.”
पण तरी सुद्धा आम्हाला त्याची किंमत वाटत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे आमची लोकशाही आणि संविधान आमच्या पर्यंत पोहचू किंवा पोहचवू दिल्या गेली नाही.
याच मताच्या अधिकाराची परवड 2004 ते 2024 या 20 वर्षात या EVM ने हिरावून घेऊन केली. जेंव्हा 2023 ते 2024 च्या काळात जनतेला या EVM चा खेळ समजला, तेंव्हा जनता जागृत होऊन रस्त्यावर उतरली. आणि या जागृतीने रौद्ररूप धारण करण्याच्या आतच मुख्य निवडणूक आयोगाने ( जो संविधाननिष्ठ नव्हे तर सरकारचा गुलाम आहें ) मोठया अट्टाहासाने EVM वरच निवडणुका घेऊन सत्ताधाऱ्यांना झुकते माप देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहें.
त्याचप्रमाणे मोदीची गोदी मीडिया एक्सिट पोलच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेचा गोंधळ निर्माण करण्यात गुंतलेली आहें. विरोधक आणि जनता जरी 4 जूनची म्हणजे उद्याची वाट पाहत असली,तरी सुद्धा संविधानविरोधी शक्तीने गेल्या 5 वर्षांपासून EVM ची सेटिंग केलेल्या प्रयत्नांना अंजाम देण्यात सक्षम असणार आहें. कारण मोदी शहाने साम, दाम, दंड आणि भेदाचा परिपूर्ण वापर केलेला आहें.
एवढेच काय शहाने तर 180 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दमच दिलेला आहें. याचा अर्थ स्पष्ट आहें,की आमच्या मताचा अनादर झालेलाच आहें. शिवाय अनेक ट्रक भरून असलेल्या EVM मशीन जनतेने पकडल्याचे व्हिडीओ समाज माध्यमावर दिसत आहेत.
या सर्वांचा परिणाम काय व्हायचा ते उद्या स्पष्ट होणारच आहें. परिणाम काहीही येवोत……
सरकार कोणाचेही येवोत,आम्हाला ( जनतेला ) मात्र यापुढे लोकशाही आणि संविधानाला ICU तुन बाहेर काढून पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल घडवायचे असेल तर या लोकशाही आणि संविधानाची जागृती जाती धर्माच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन करणे हाच एकमेव उपाय असेल…
अन्यथा याच कूटनितीच्या राजकारण्यांचे व राजकीय पक्षांचे गुलाम बणूनच नालीतल्या किड्याप्रमाणे जगता – जगता मरावे आणि मरता -मरता दयनीय अवस्थेत जगावे लागेल……….
ना आम्हाला व देशाला कोणतेच भविष्य नसेल……………
आवाहनकर्ता आणि जागृतीचा लेखक..