ब्रेकिंग न्युज… श्रेणीवर्धन व अंगनवाडी ईमारत दुरुस्ती साहित्य खरेदी प्रकरणात शासनाची फसवणुक केल्याने तालुका बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह तिन आरोपीच्या विरोधात गटविकास अधिकाऱ्यांनी नोंदवली पोलीस स्टेशनला तक्रार… — भांदवी ४०९,४२०,१२०,(३४) कलमान्वये गुन्हा दाखल..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

      पारशिवनी :- पारशिवनी तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह आरोपी क्रमाक (२) श्री.बुक डेपो व जनरलस्टोर्स यवतमाल मालक,(३) शांभवी एज्युकेशन एडसचो मालक, आणी (४) आरोपी वृषाली इम्पोरियलचे मालक यांच्या विरोधात पंचायत समिती पारशिवनीचे खंडविकास अधिकारी सुभाष परसराम जाधव यांनी पोलिस स्टेशन पारशिवनी येथे तक्रार नोंदवली.

         बालविकास प्रकल्प अधिकारी पारशिवनी,श्री.बुक डेपो जनरल स्टोर यवतमालचे मालक,शांभवी एज्युकेशन एडस नागपुरचे मालक,वृषाली एम्पोरियल चेहरे मालक असे चार आरोपी आहेत.

      या सर्वांनी कट रचून संगणमताद्वारे शासनाकडून अंगनवाडी श्रेणीवर्धन साठी व तालुकाची अंगणवाडी केन्द इमारत देखभाल दुरुस्ती अंतर्गत ८ लाख रुपये निधीत अनियमितता दिसून आली.

       अंगणवाडी श्रीवर्धन व साहित्य खरेदी प्रकरण मध्ये अनियमितता करून शासनाच्या निधीचा अपव्यय करून गैरव्यवहार करून शासनाची फसवणुक केल्याच्या तक्रारीवरून पोलिस निरिक्षक राजेश थोरात यानी अपराध क्रमाक १८६/२४ अन्वये कलम ४०९,४२०,१२०( ब),३४ भादवी गुन्हा नोंद केला आहे.

       गुन्हाचा पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक वैरागडे स्टाफसह करित आहे.