लक्ष्मी नरसिंह देवस्थान आराखड्यातील ठेकेदारांचा मनमानी कारभार… — कामे पूर्ण होणार कधी?भावीक भक्त व ग्रामस्थांमध्ये चर्चेचा सूर…

 

निरा नरसिंहपुर दि.3 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

            नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील भीमा व निरा नद्यांच्या संगमावर आसलेले लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असल्यामुळे विकास कामाला कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा कामे मंद गतीने चालू आहेत.

         देवस्थानच्या आराखड्यासाठी 260 कोटी रुपयांची कामे मंजूर करून काही कामे पूर्ण झाली तर आनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत.

          उन्हाळ्याचे दिवस संपुष्टात आले आसून पावसाळा हंगाम अगदी जवळ आला तरी पण भिमा नदीकडेच्या भागाकडील व नद्यांच्या संगमा समोरील कामे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रखडलेली आहेत.अनेक दिवस उलटून गेले तरी पण कामे पूर्ण होत नाहीत.

       भीमा नदीवरील मोठ्या पुलाशेजारील मंदिराच्या उत्तरे कडील घाटाचे काम अध्यापन काहीच झालेले नाही.पावसाळा हंगामात दोन्हीही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतात या पुराच्या पाण्यामुळे झालेले काम पूर्ण वाहून जाईल.हे ठेकेदाराच्या लक्षात का म्हणून येऊ शकत नाही?भाविकांमध्ये याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.

       लक्ष्मी नरसिंहाच्या मंदिरापासून काही अंतरावर उत्तर बाजूस मोठ्या फुलाशेजारील भीमा नदी कडेच्या परिसरातील कामे काहीच न झाल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या ठिकाणी सर्व काही केलेली अर्धवट कामे पाण्याच्या दाबामुळे वाहून जाईल,,

बांधकाम विभागाने लक्ष्मी नरसिंह देवस्थान आराखड्यातील संपूर्ण ठिकाणी चालू आसलेल्या कामाकडे लक्ष घालून पाहणी करावी व कामे पूर्ण करून घ्यावी ही भाविकांची मागणी.