गडचिरोली पोलीस दलामार्फत “पोलीस दादालोरा खिडकी “च्या माध्यमातुन पोमके रेगडी येथे जनजागरण मेळावा व नवीन प्रशासकिय ईमारत उद्घाटन सोहळा संपन्न.

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली :-अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांचा दिनांक ०३/०५/२०१३ रोजी गडचिरोली जिल्हा दौरा पार पडला. यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी ” चे माध्यमातुन गडचिरोली जिल्हयातील जनतेचे जीवनमान उंचवण्याच्या उद्देशाने पोमके रेगडी येथे आयोजित केलेल्या जनजागरण मेळाव्यास उपस्थीत होते. त्या अगोदर नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ना. अपर पोलीस महासंचालक यांचे हस्ते पार पडले.

       यावेळी उपस्थित नागरीकांशी संवाद साधतांना गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी सरकारच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यात येतील तसेच कुटल्याही प्रकारच्या समस्या आल्यास पोलीस विभागाला संपर्क करावा. तसेच त्यांनी उपस्थित नागरीकांना शेतीच्या माध्यमातुन गावाचा विकास करण्याचे आव्हान केले व नविन पिढीतील युवक/युवतींना उच्च शिक्षण घेण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपविभाग गडचिरोली अंतर्गत पोमके रेगडी हद्दीतील ५०० आदिवासी बांधव उपस्थित होते. उपस्थित आदीवासी बांधवांना कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप करण्यात आले असून त्यात साडी, धोतर, व्हॉलीबॉल, क्रिकेट बॅट, स्प्रे पंप, नोटबुक, कंपास, बॉलपेन, ब्लॅकेट, ताटपत्री, छत्री, व्हॉलीबॉल नेट, बिस्किीट व चॉकलेट्स इत्यादी साहीत्यांचे वाटप करण्यात आले.

      आतापर्यंत गडचिरोली प्रशासनाकडुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ५५१, नर्सिंग असिस्टंट १२३७, हॉस्पिटॅलिटी ३१४, ऑटोमोबाईल २७६, ईलेक्ट्रीशिअन १७६, सेल्समैन ०५, कंपनी रोजनदारी १५५, प्लम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल ड्यूटी असिस्टंट ३१४, फील्ड ऑफीसर १९ व व्हीएलइ ५२ असे एकूण ३१५५ गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १७४, कुक्कुट पालन ५६५, बदक पालन १०० शेळी पालन १४२ शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ५३ फोटोग्राफी ६५, स्पॉट टाईज ३५, एमएससीआयटी २३१, वाहन चालक ५९२, भाजीपाला लागवड १३९५, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण १०६२, टू व्हिलर दुरुस्ती १३४, मत्स्यपालन ८७, वराहपालन १०, फास्ट फूड ९६, पापड लोणचे ५७, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकूण ५१२५ युवक/युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

       सदर जनजागरण मेळाव्याच्या कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक श्री. प्रवीण साळुंके सा. पोलीस उप महानिरीक्षक श्री. संदीप पाटील सा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा., व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. प्रणील गिल्डा सा. हे उपस्थित होते.

     सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोमके रेगडी प्रभारी अधिकारी श्री. नंदकुमार शिब्रे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.