गिरीराज हॉस्पिटल येथे सर्व शस्त्रक्रिया व सुविधा सवलतीच्या दरात,, पुणे व मुंबई या ठिकाणी जाण्याची गरज नाही डॉ. रमेश भोईटे… — गिरीराज हॉस्पिटल येथे मोफत मेंदू व मणका विकार शिबिर संपन्न…

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 3

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

बारामती येथील सुप्रसिद्ध डॉ रमेश भोइटे यांच्या गिरीराज हॉस्पिटल येथे रा तू भोइटे स्मृति आरोग्य प्रतिष्ठान व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मेंदू व मणका महा शिबिर यशस्वी रित्या संपन्न झाले. एकदिवसीय शिबिरात बारामती व संलग्न तालुक्यातील विक्रमी संख्येने रुग्ण लाभार्थी ठरले.

शिबिरा प्रसंगी डॉ. रमेश भुईटे बोलत आसताना म्हणाले की या शिबिरामध्ये आलेल्या गोरगरिब गरजू नागरिकांना मोफत शस्त्रक्रिया तसेच सवलतीच्या दारात इतर लॅबटेस्ट सिटीस्कॅन केला जाईल, योजनेअंतर्गत सर्व सवलती रुग्णांना देण्यात येतील.तसेच हॉस्पिटल मधील माझ्या सहित सर्व डॉक्टर स्टॉप व कर्मचारी वर्ग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रुग्णालयातील पेशंटला चांगल्या प्रतीची सेवा देत आहेत,, डॉ. रमेश भोईटे यांचे यावेळी उद्गार

         पुण्याचे प्रथितयश मेंदू व मणका विकार सर्जन डॉ राहुल चौधरी , डॉ दर्शन गौड , डॉ निनाद पाटील, यानी शिबिरात दुर्धर मेंदू व मणका विकाराने ग्रस्त असलेल्या ग्रामीण रुग्णांना मोफत मार्गदर्शन व सेवा दिली. शिबिरात मोफत शस्त्रक्रिया, तसेच सवलतीच्या दरात लॅबटेस्ट, सिटी स्कॅन, एम आर आय स्कॅन याचा समावेश होता. 

          महाशिबिर उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ रमेश भोइटे यानी गिरीराज हॉस्पिटल मध्ये यशस्वी रित्या संपन्न झालेल्या मेंदू व मणका शस्त्रक्रिया विषयी माहिती दिली. ग्रामीण भागातील रुग्णांना आता मेंदू व मणका शस्त्रक्रियेसाठी पुणे मुंबई ला जाण्याची गरज नाही. गिरीराज हॉस्पिटल येथे सर्व शस्त्रक्रिया अत्यंत सवलतीच्या दरात पार पाडल्या जातात. त्यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा ह्याची मोठी बचत होते. असे प्रतिपादन केलं.

        या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ राहुल चौधरी , डॉ निनाद पाटील व डॉ दर्शन गौड यांनी गिरीराज हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेले अद्ययावत ऑपरेशन थिएटर , उपकरणे , ऑपरेटिंग मायक्रो स्कोप , कुशल मनुष्यबळ व डॉ भोइटे सर यांचे मार्गदर्शन यांचा आदरपूर्वक उल्लेख केला.  

         गिरिराज हॉस्पिटल चा आढावा व मान्यवरांचे आभार प्रदर्शन महासचिव सौ निर्मलाकाकी भोइटे यांनी केले.  महाशिबिराचे नियोजन व प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक श्री प्रशांत भोसले यांनी केले. डॉ केशव डाखोरे, डॉ रमेश निकम, डॉ चैतन्य इनामदार, डॉ चंद्रशेखर कोकाटे, डॉ प्रतीक पाभरेकर, श्री अप्पा हिंगसे , श्री राहुल नाकाडे , गिरीराज कर्मचारी वृंद यांचा ह्या शिबिरास मोलाचा हातभार लागला .शिबीराचे प्रस्ताविक मुख्य व्यवस्थापक प्रशांत भोसले यांनी केले .तर आभार प्रदर्शन महासचिव निर्मलाकाकी भोईटे यांनी मानले. शेवटी महाराष्ट्रगीताने शिबिरची सांगता झाली.