अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून मोबदला द्या…  — राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन…

संजय टेंभुर्णे 

कार्यकारी संपादक 

दखल न्यूज भारत

मागील काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि काही भागात झालेली गारपिट यामुळे धान, मक्का, भाजीपाला, फळबागा या सर्वांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. तसेच सातत्याने होत असलेल्या रिमझिम पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर मातीची घरे व गुरांचे गोठयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची व सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी यासंबंधीचे निवेदन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

       जिल्हयात सुमारे 30 हजार हेक्टरवर उन्हाळी धानाचे पिक असुन मोरगाव अर्जुनी व सड़क अर्जुनी या दोन तालुक्यात धान पिकाला पर्याय म्हणुन शेतकन्यांनी मोठ्या प्रमाणावर मक्का या पिकाची लागवड केलेली आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांना नगदी पिके म्हणुन भाजीपाल्याची लागवड सुध्दा केलेली आहे. परंतु काही दिवासापासुन सातत्याने अवकाळी पाऊस होत असल्याने धान, मक्का, भाजीपाला, फळबागा या सर्वांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. या सर्वांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना मा.जिल्हाधिकारी,गोंदिया यांच्या मार्फत देण्यात आले. अवकाळी पाऊसात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी व सामान्य जनतेत आक्रोश निर्माण झालेला आहे त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ पाहुल उचलून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. 

        प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, पूजा सेठ, विशाल शेंडे, बालकृष्ण पटले, किशोर तरोने, केवल बघेले, लोकपाल गहाणे, यशवंत परशूरामकर, अविनाश काशिवार, प्रभाकर दोनोडे, रफिक खान, प्रेमकुमार रहांगडाले, किरणं कुमार पारधी, शंकरलाल टेंभरे, विनीत सहारे, सचिन शेडे, राजकुमार जैन, अखिलेश सेठ, मयूर दरबार, सय्यद इकबाल, मोहन पटले, हेमकृष्ण संग्रामे, टी एम पटले, राजेश तुरकर, पन्नालाल डहारे, योगेश नाकाडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, सुनील पटले, शैलेश वासनिक, दानिश साखरे, नागो बन्सोड, निप्पल बरय्या, आरजू मेश्राम, तुषार ऊके, किशोर ब्राह्मणकर, विनोद चुटे, धनेश्वर तिरेले, यादोराव तरोणे, लक्ष्मण नागपुरे, कांतीकुमार बागडे, विजय रंहागडाले, दीपक कनोजे, रौनक ठाकूर, वामन गेडाम, शरद मिश्रा, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, अरमान जयस्वाल, दर्पण वानखेडे, गौरव शेंडे, नरेंद्र बेलगे सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.