शिक्षणाची दारे उघडणा-या क्रांतीज्योतींचे आचरणाची आवश्यकता :- मुख्याध्यापक डी.डी. वलथरे  — जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

            साकोली : सर्वांसाठी शिक्षणाची दारे उघडणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आचरण अंगी आणून ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ या ब्रिदवाक्याप्रमाणे शिक्षण क्रांतीतून अनेक अभ्यासक्रमात सामोरे जा असे प्रतिपादन मुख्याध्यापक डी. डी. वलथरे यांनी बुधवर ०३ जानेवररीला सावित्रीबाई फुले जयंती प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात मुले सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेषभूषेत आले होते हे विशेष. 

     कार्यक्रमाला मंचावर मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, पालक विष्णू कापगते, सहायक शिक्षक एम. व्ही. बोकडे, रेशमा कोवे आदी उपस्थित होते. संचालन शिक्षक रामकृष्ण बांगळे यांनी केले. शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विद्यार्थी विद्यार्थिनी याच महापुरुषांच्या वेषभुषेत आले होते. त्यांकडून शिक्षणाच्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उल्लेखनीय संभाषण केले.

             कार्यक्रमाला शिक्षक तुळशीदास पटले, शिक्षिका शालिनी राऊत, बलवीर राऊत, आरती कापगते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाअंती आभार कार्तिक साखरे यांनी मानले.