ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :: स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून नगर अध्यक्ष करीता खुला प्रवर्ग 5000/ रु., SC, ST व महिलांकरीता 2500/- रु, नगरपरिषद सदस्य खुला प्रवर्ग 2000/- SC, ST व महिलांकरीता 1000/- रु, जिल्हा परिषद सदस्य खुला प्रवर्ग 2500/-रु, SC, ST, व महिलांकरीता 1250/-, पंचायत समिती सदस्य खुला प्रवर्ग 1500/-, SC, ST, व महिलांकरीता 750/- रु प्रमाणे इच्छुकांनी शुल्क भरून दिनांक 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली, आमदार रामदास मसाराम जनसंपर्क कार्यालय वडसा किंवा सर्व तालुकाध्यक्ष, मार्फत जमा करता येणार आहे.
त्या नंत्तर प्राप्त अर्जापैकी 6 नोव्हेंबर 2025 रोजी, जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येते नगरपरिषद (गडचिरोली /आरमोरी /वडसा ) करीता प्राप्त इच्छुक उमेदवारांच्या जिल्हा निवड मंडळ मार्फत मुलाखती घेण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षामार्फत निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर करावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.



