१० वर्षीय निष्पाप मुलाचा गेला जीव…  — शेतातील तारेला जिवंत विद्युत प्रवाह जोडने येणार अंगलट.. — मदनापूर येथील घटना…

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

 

चिमूर : – आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास विष्णू विनोद कामडी वय १० वर्षे व्यायाम करण्याकरिता जय लहरी जय मानव विद्यालय येथे गेला होता.

               काही अंतरावर गोवर्धन रंदये यांच्या शेतात शौचास जाऊन येत असतांना हाताचा स्पर्श शेतात लागून असलेल्या तारेला झाला.शेतातील तारेला इलेक्ट्रिक करंट लागून असल्याने विष्णू विनोद कामडी वय १० वर्षे हा जागेवरच मरण पावला.

                 शेतात इलेक्ट्रिक करंट लावणे गुन्हा आहे.मात्र मदनापूर गावाशेजारी जंगल लागून असल्याने जणावरांपासून शेत मालाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेताच्या सभोवताल तारेचे कुंपण तयार करतात.तारेच्या कुंपणाला वन्यप्राणी मानत नसल्यामुळे त्यांच्यापासून शेतमालाचे रक्षण करण्यासाठी प्रासंगिक विद्युत प्रवाह तारेच्या कुंपणाला जोडतात.तद्वतच मदनापूर हे पर्यटन स्थळ म्हणून नावाजलेले गाव आहे. 

          मात्र, तारेला असलेल्या जिवंत विद्युत प्रवाहामुळे १० वर्षीय मुलाचा अत्यंत दुःखद अंत झाल्याने मदनापूर वासियांमध्ये शोककळा पसरली आहे.

           जनावर शेतात घुसून पिकाची नासधूस करु नये हा उद्देश शेतकऱ्यांचा असतो.परंतु जिवंत विद्युत तारेचा करंट शेतातील तारेला लावून ठेवणे हा गुन्हा आहे.म्हणून शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

           मुलाचे शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.