आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या संपला अखेर यश.

       राजेंद्र रामटेके

कुरखेडा तालुका ग्रामीण प्रतिनिधी..

           राज्य स्तरावरुन वरून मिळालेल्या बातमी नुसार आशा योजना अंतर्गत आशा स्वयंसेविका यांना राज्य शासन मोबदला ५ हजार रुपये वरून दर माह १२ हजार रुपये देणार आहे.

         नियमित मानधन रू २ हजार रुपये असून एकूण रु.१५ हजार रुपये प्रती महिना आशां वर्करना मिळणार असल्याची शक्यता आहे.

            तसेच आशा गट प्रवर्तक यांना राज्य शासन मोबदला ६ हजार २०० रुपये वरुन १२ हजार चारशे रुपये केला आहे.याचबरोबर ८ हजार ४७५ रुपये मुळ मदत दिली जाणार आहे.यामुळे गट प्रवर्तक यांना २० हजार ८७५ वेतन लागू करण्यात आले आहे.

            आशा ताईंच्या एकजुटी पुढे महाराष्ट्र सरकारने झुकते माप देत मानधनात वाढ केली आहे.आणि इकडे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३० टक्केच मानधन राज्य सरकार देत आहे…

         एकजूट मध्ये काय ताकत असते हे आशा स्वयं सेविका यांनी दाखवून दिले आहे…