कार्यकर्ता हा पक्षाचा कणा:- आमदार कृष्णा गजबे…

 

ऋषी सहारे

संपादक

चामोर्शी:.  

       दिनांक 31 ऑगस्ट रोज गुरुवारी विश्राम गृह चामोर्शी येथे आरमोरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार कृष्णा गजबे यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटना बांधनी कामानिमित्त पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुक्याच्या वतीने आमदार कृष्णा गजबे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

    उपस्थित समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांचे म्हणणे आमदार गजबे यांनी ऐकून घेऊन सर्वांसोबत चर्चा केली.  

     कार्यकर्ता मजबूत असेल तर आपला बुथ मजबूत असतो. कार्यकर्ता प्रामाणिक काम करुन आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतो. कार्यकर्ता आहे म्हणून नेता आहे. कार्यकर्ता शिवाय नेता होता येत नाही. प्रत्येक नेत्याची ताकत हा‌ त्याचासाठी काम करणारा कार्यकर्ता असतो. पक्ष मजबूत करणे, पक्षाचे ध्येय धोरणे तळागळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता मजबूत असतो आणि प्रखर पणे आपल्या पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवितो. म्हणूनच कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

      यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी व भारतीय जनता पार्टी चे पदादिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.