Home Social दर्यापूर नगर पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास मोकाट जनावरांना मुख्याधिकारी दालनात...

दर्यापूर नगर पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास मोकाट जनावरांना मुख्याधिकारी दालनात कोंडणार :- युवासेनेचा इशारा…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

    दर्यापूर शहरातील नगर परिषद परिसरातील नागरिकांना भेडसावणा-या विविध मुलभूत नागरी सेवा सुविधा, समस्या तातडीने सोडविण्याबाबत याबाबत नगर परिषद विभागाचे मुख्याधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी अनेक विनंती पूर्वक निवेदने सादर केली आहेत.

       बरेच वर्षापासून नगर परिषद विभागाकडे प्रशासकीय राज सुरु असून मनमानी पद्धतीने कार्यभार सुरु आहे. दर्यापूर शहरातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा करणेबाबत नगर परिषद प्रशासनाकडून कोणतेही लेखी उत्तर अद्यापही प्राप्त झाले नाही.

        त्यामुळे नगर परिषद प्रशासनाला नागरिकांना भेडसावणा-या मुलभूत नागरी सेवा सुविधा, समस्या सोडविण्याबाबत नगर परिषद प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. मुख्याधिकारी यांनी जनतेला भेडसावणा-या अपुऱ्या असलेल्या नागरी सुविधा पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात याव्यात.

         नागरिकांच्या समस्यांचा निपटारा दि.5 ऑगस्ट रोजीच्या आत बैठकीचे आयोजन करून सोडविण्यात बाबत युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या वतीने अंतिम सूचना मुख्याधिकारी यांना दिली आहे. जर का मुख्याधिकारी यांनी दर्यापूर शहरातील नागरिकांना भेडसावणा-या मुलभूत नागरी सेवा सुविधांची उपलब्धता केली नाही तर आमदार गजाजन लवटे यांच्या नेतृत्वात दि. 13 ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत नगर परिषद येथील मुख्याधिकारी यांच्या दालनात मोकाट जनावरांना कोंडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आदोलन छेडण्याच्या इशारा युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला आहे.