युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत गठीत समितीच्या वतीने दर्यापूर येथील क वर्ग बस स्थानकाचे दुसरे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर विभागाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे,विभागीय स्थापत्यं अभियंता ऋषिकेश होले,पत्रकार धनंजय धांडे आदी उपस्थित होते.
यावेळी समितीतील अधिकारी स्मिता सुतवणे आदींनी दर्यापूर बस स्थानकाची संपूर्ण पाहणी करून व्यवस्थापन, स्वच्छता व विविध कामांचा आढावा घेतला, त्यानंतर बस स्थानकाच्या विविध विभागांचे मूल्यांकन केले. विविध विभागात झालेल्या कामांचा मापदंड करीत गुण विभागणी करण्यात आली.
यावेळी बस स्थानकातील संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना विविध सूचना व संकल्पना देण्यात आल्या. तसेच प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशाप्रकारे देण्यात येतील यावर सखोल चर्चा करण्यात आली. दरम्यान पत्रकार धनंजय धांडे यांनी महामंडळाच्या उत्पन्नात कशाप्रकारे वाढ होऊ शकते व प्रवासी सुविधेबद्दल आपले मत व्यक्त केले. यावेळी सहाय्यक वाहतूक अधिक्षक अरविंद पोटदुखे,लिपीक स्नेहल अडगोकार व प्रवाशी मित्र उपस्थित होते.



