ऋषी सहारे
संपादक
चामोर्शी :- तालुक्यातील आष्टी व परिसरात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री, गावगुंडगिरी, जुगार, सट्टा आणि इतर अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांचे सामाजिक जीवन बिघडले आहे तसेच तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे.
या विरोधात अवैध दारू विक्री व धंदे करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी घेऊन आजाद समाज पार्टी युवा आघाडी च्या वतीने जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
सदर प्रकारांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, कुटुंबात रोज वाद होत आहेत. शाळकरी मुलांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. सार्वजनिक शांतता भंग होत आहे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे.
म्हणून आजाद समाज पार्टी युवा आघाडी च्या वतीने मागणी करीत आहोत की,
1. आष्टी परिसरातील सर्व अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
2. जुगार, सट्टा व अन्य अवैध धंदे करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.
3. पोलिसांचे गस्त वाढवण्यात यावे.
4. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक तयार करण्यात यावे.
5. ग्रामस्थांच्या सहकार्याने अवैध धंद्यांविरोधात जनजागृती अभियान राबवण्यात यावे.
जर प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केले, तर ग्रामस्थ व आजाद समाज पार्टी युवा आघाडीला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
आपण या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी असे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देते वेळी विवेक खोब्रागडे, प्रकाश बनसोड व पदाधिकारी उपस्थित होते.



