Home Social पिंपरी बुद्रुक येथे नागपंचमी निमित्त मंगळागौरी उत्साहात पूजा करून पंचमी साजरी… ...

पिंपरी बुद्रुक येथे नागपंचमी निमित्त मंगळागौरी उत्साहात पूजा करून पंचमी साजरी… — पोलीस पाटील वर्धमान बोडके यांच्याकडे परंपरे पासून मंगळागौरी पूजेचा मान…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पोलीस पाटील वर्धमान बोडके यांच्या निवासस्थानी महिला व ग्रामस्थांच्या वतीने नागपंचमी निमित्त मंगळागौरीची महापूजा करण्यात आली. यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी व महिला भगिनी यांनी गर्दी केली.रांगेत उभे राहून मंगळागौरीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

         नागपंचमी निमित्त सकाळी मंगळागौरीचा अभिषेक पूजा आरती भजन महाप्रसाद असे दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पाडले.नागपंचमी निमित्त महादेव मंदिरात भाविक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.

        मंगळागौरीचा खेळ खेळत फेरा धरून गौराई ची गाणी आनंदाने महिला गात होत्या. काही महिला झोका घेऊन आनंद घेत होत्या तर काही महिला गोल फुगडीचा आनंद घेत होत्या. छोटे बालक व ग्रामस्थ आनंदाने पतंग ही आकाशात उंच लावत आनंद घेत होते. अनेक प्रकारे नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.

         शेवटी संध्याकाळी सहा वाजता वाजत गाजत फटाक्यांच्या आवाजात मंगळागौरीची ग्राम प्रदक्षिणा करून मंगळागौरी भीमानदी पात्रात विसर्जन करण्यात आली. व शेवटी महाप्रसाद घेऊन नागपंचमीची सांगता झाली.

चौकट…

       नरसिंहपुर, टणु, गिरवी, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गोंदी, लुुमेवाडी, सराटी, लिंबोडी,गणेशवाडी चव्हाण वस्ती, सुतार वस्ती, आडोबा वस्ती, शिंदे वस्ती, आधी सर्व भागात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.