Home Social शासनाच्या योजना जिल्ह्यातील दिव्यांगांपर्यंत पोहचवा…

शासनाच्या योजना जिल्ह्यातील दिव्यांगांपर्यंत पोहचवा…

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली :- महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार दिव्यांगांच्या हिताच्या अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. सरकारचे घटकपक्ष म्हणून शासनाच्या योजना जिल्ह्यातील दिव्यांगांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या प्रदेश अध्यक्षा निताताई चव्हाण यांनी केले. 

         त्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गडचिरोली स्थीत सर्किट हाऊस येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर होते. 

        पुढे बोलताना निताताई चव्हाण यांनी समाजातील जास्तीत जास्त दिव्यांग घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जोडून पक्षाची सदस्य नोंदणी करताना दिव्यांग व्यक्तींना सदस्य करून घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

         या वेळी बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव प्रा.ऋषिकांत पापडकर, जिल्हा उपाध्यक्ष फहीमभाई काझी, योगेश नांदगाये, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हा कार्याध्यक्षा सुषमा येवले, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष संजय शिंगाडे, विद्यार्थी सेल जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, किशोर बावणे, मयूर धकाते, हर्षवर्धन मडावी, वृषभ कुळमेथे, चेतन हुलके, कृष्णा शेंडे, होमराज तुनकलवार प्रामुख्याने उपस्थीत होते.