ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
भंडारा – स्वतःचे कल्याण करायचे असेल तर वारकरी संप्रदायाच्या स्वीकार करा असे मार्गदर्शन ओमदेव महाराज चौधरी यांनी प्रशिक्षणार्थी शिबिराला मार्गदर्शन करताना केले. पुढे ते म्हणाले की ,वारकरी संप्रदायाच्या मार्ग अत्यंत मजबूत असून त्यालाकोणीही तोडू शकत नाही.त्यामुळे अशा अथांग सागराच्या लाटेत आपण संत तुकाराम महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन यामध्ये आपण विलीन व्हावे असे सुद्धा त्यांनी सांगितले.
इतकेच नव्हे तर तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेला मूठ माती देण्याचे काम केले आणि तेच काम आपल्याला करायची आहे असे त्यांनी भंडारा तालुक्यातील पहेला येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथे ज्ञानोबा तुकाराम वारकरी सेवा ट्रस्ट वेलतूर संचालित सद्गुरु जोग महाराज वारकरी गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर व श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन तिथी वैशाख कृष्णपंचमी 17 मे 2025 रोज शनिवार ते ज्येष्ठ शुक्ल षष्ठी 1 जून 2025 पर्यंत सद्गुरु जोग महाराज गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात मार्गदर्शन केले.
वरील शिबिराला ह.भ.प.गु .सुमन महाराज देशपांडे,ह.भ.गु.चैतन्य महाराज झंजाळ, ह.भ.प गु.भगवान महाराज माहुरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या शिबिराला मार्गदर्शन शिबिरार्थी यांना ह.भ.प. गु. कपिल महाराज(शास्त्री )लांजेवार, ह.भ.प .गु.,संगीत विशारद दिगांबर महाराज ठाकरे ( आळंदी)देव, मृदंग विशारद ह. भ. प .गु. गणेश महाराज गुरडकर विदर्भभूषणआळंदी (देवाची) ,ह. भ. प .गु .मृदुंग विशारद प्रज्वल महाराज थेटे पाटील अमरावती , ह .भ .प .गु. गायनाचार्य नंदकिशोर महाराज चौधरी, ह. भ .प .गु .शिक्षक वृंद चंद्रशेखर महाराज हटवार यांनी मार्गदर्शन केले.
वरील शिबिराचे सल्लागार आधारस्तंभ ह. भ .प. डॉ.संजय दादा एकापुरे असून संस्थाचालक ह. भ .प .ओमदेव महाराज चौधरी यांच्या सहकार्याने सद्गुरु योग महाराज वारकरी गुरु दत्त मंदिर यांचे नियोजन करण्यात आले होते या शिबिराला जवळपास 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अनिल डोंगरवार ,प्रदीप ढबाले ,नितीन गायधने ,कुलदीप गंधे,अमित शिवणकर, गुहा बोरीकर, राजू पुडके,सत्यभामा गेडेकर, गणपत माथुरकर व निमगाव गावातील समस्त नागरिकांनी सहकार्य केले. सदर शिबिराला पत्रकार संजीव भांबोरे यांनी सुद्धा भेट दिली होती.
यावेळी ओमदेव महाराज चौधरी यांनी सद्गुरु योग महाराज यांची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या सन्मान केला.



