बियाणे व कृषि निविष्ठा खरेदी करतांना शेताऱ्यांनी काळजी घ्यावी, तालुका कृषि अधिकारी दिपक आहेर यांचे शेतकऱ्यांना आव्हान…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

             खरीप हंगाम 2024 ची लगबग सुरु झाली असून तालुक्यातील शेतकरी बियाणे खरेदीचे कामाला लागले आहेत. खरीपात तालुक्यातील मुख्य पिक हे भात 25867 हेक्टर असून त्यापाठोपाठ कापूस पिक 815 हेक्टर क्षेत्रावर दुसऱ्या क्रमांकाचे पिक लागवड केल्या जाते. लागवड क्षेत्रानुसार दोन्ही पिकांचे शासकीय बियाणे महामंडळाची व खासगी कंपण्यांची बियाने मोट्या प्रमाणात कृषि केंद्रातून किंवा इतरही स्रोत्रांकडून शेतकरी खरेदी करतात. ही बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेने अवशक आहे.

            याच अनुषंगाने तालुका कृषि अधिकारी श्री दिपक आहेर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना अधिकृत नोंदणी असलेल्या कृषिकेंद्र संचालकांकडूनच बियाणे व इतर निविष्ठा खरेदी करावे.

          तसेच बियाणे खरेदी करतांना प्रमाणित किंवा सत्यता दर्शक बियाणे खरेदी करावे व बियाण्याचे बॅगला इत्यंभूत माहितीसह योग्य रंगाचे टॅग असल्याची खात्री करून सर्व नोंदीसह पक्के बिल घ्यावे. कुठल्याही परिस्थितीत अनधिकृत विक्रेत्याकाढून बियाणे खरेदी करू नये. तसेच कपास पिकाचे बियाणे खरेदी करतांना आपले राज्यात मान्यता असेलेले सुधारित बियार खरेदी करावे.

              HTBT (चोरबीटी) तंत्रज्ञानाने तयार लेलेले बियाणे लागवडीस प्रतिबंध असल्याममुळे असे बियाणे खरेदी करू नये. HTBT कपास बियाणे वापरामुळे जमीन व निसर्ग यांचेसह मानवी आरोग्याचीही मोठी हानी होत असल्याचे सांगत यात शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता सल्याचे ते म्हणाले. तसेच उत्पादक कंपनीने निर्धारित केलेल्या किमतीतच बियाणे व कृषि निविष्ठा खरेदी करावे आणि अधिक किंमत घेणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाचे व अनधिकृत बियाणे विक्री करणारे विक्रेत्यांची तक्रार तालुका गुणनियंत्रण समिती तथा भरारी पथक यांचेकडे करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी तथा पथक प्रमुख दिपक आहेर यांनी केले आहे.

            शेतकऱ्यांनी बियाणे पेरणी करतांना जमिनीत योग्य ओलावा तयार झाल्यावरच म्हणजेच 70 ते 100 मी.मी. पाऊस झाल्यावरच बियाण्याची उगवण क्षमता तपासून व योग्य ती जैविक आणि राषायनिक बीज प्रकारिया करूनच पेरणी करावी करावी असेही आव्हान त्यांनी केले.

            जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचे पत्रानुसार तालुक्यात कृषि निविष्ठा गुणांनियंत्रण भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून सदर पथकात पथक प्रमुख म्हणून तालुका कृषि अधिकारी दिपक आहेर, सदस्य सचिव म्हणून प. स. चे कृषि अधिकारी सुशील आडे तर सदस्य म्हणून डी. डी. दंडारे वजन मापे निरीक्षक, मंडळ कृषि अधिकारी दिनेश पानसे, कृषि अधिकारी आश्या शिंदे यांचा समावेश असून सदर समिती कृषि विभागाचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे मार्फतीने, तालुक्यातील बियाणे, खते व अन्य निविष्ठाचे गुंनियंत्रण बाबत गांभीर्यपूर्वक लक्ष्य ठेऊन असल्याचे सांगण्यात आले.